शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

'मंगला' हत्तीणीच्या स्थलांतराचा पुन्हा प्रयत्न; ग्रामस्थांच्या विरोधानंतर वनमंत्र्यांचा हस्तक्षेप

By संजय तिपाले | Updated: February 7, 2024 14:46 IST

जिल्ह्यातील आलापल्ली व सिरोंचा वन विभागात सात ते आठ दशकांपूर्वी वनविभागाची अवजड कामे करण्यासाठी केरळहून हत्ती आणले होते.

गडचिरोली : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या अहेरीच्या कमलापूर येथील मंगला नावाच्या हत्तीणीला पेंच अभयारण्यात हलविण्याचा डाव ७ फेब्रुवारीला पुन्हा एकदा हाणून पाडण्यात आला. ग्रामस्थांनी विरोध केल्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी यात लक्ष घातले व मंगलाला न्यायला आलेली वाहने रिकामीच परतली.

जिल्ह्यातील आलापल्ली व सिरोंचा वन विभागात सात ते आठ दशकांपूर्वी वनविभागाची अवजड कामे करण्यासाठी केरळहून हत्ती आणले होते. तेव्हापासून कमलापूर येथे निसर्गरम्य धबधबा व तलावाजवळ हे हत्ती वास्तव्यास आहेत. पुढे कमलापूरला हत्ती कॅम्पचा दर्जा मिळाला. राज्यातील हा एकमेव हत्तीकॅम्प असून  जिल्ह्याचे ते वैभव आहे. मागील दोन वर्षांपासून येथील हत्तींना इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वीही पातानील येथील तीन हत्ती अंबानींच्या प्राणी संग्रहालयात हलवण्यात आले होते. सद्यस्थितीत येथे ८ हत्ती असून त्यातील मंगला हत्तीनीला पेंच अभयारण्यात नेण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी मंगलाला घेऊन जाण्यासाठी मोठे वाहन परिसरात दाखल होताच गावकऱ्यांनी विरोध सुरू केला.  

पर्यावरणप्रेमींनी ही माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कळवली.  त्यानंतर त्यांनी हत्ती हलविण्याच्या हालचालींना थांबवण्याची सूचना केली. त्यामुळे वाहनांना रिकामे परतावे लागले. एकेकाळी नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी हा परिसर ओळखला जात होता, परंतु मागील दहा वर्षांत हत्तीकॅम्पमुळे हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आला आहे. दरवर्षी राज्यभरातून हजारो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिकांना या हत्तीकॅम्पबद्दल विशेष आकर्षण आहे. यासंदर्भात सिरोंचाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.दोन महिन्यांपूर्वीही प्रयत्न

कमलापूर कॅम्पमध्ये अजित, मंगला, बसंती, रूपा, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी असे आठ हत्ती आहेत. हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच मंगला हत्तीणीला पेंचला स्थलांतरित करण्याचा घाट घातला होता. 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पर्यावरण व प्राणीप्रेमींनी विरोध केला. त्यामुळे वनविभागाने हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारGadchiroliगडचिरोली