शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

मालदुगीला वनहक्क प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:24 IST

मुख्यमंत्र्यांच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ठ कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील ग्रामस्थांना वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनीवर सामुहिक वनहक्काचे शासनाचे पत्र तहसीलदार अजय चरडे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देतहसीलदारांच्या हस्ते पत्र प्राप्त : ग्रामसभा सदस्य झाले ३२५ हेक्टर वन जमिनीचे मालक

ऑनलाईन लोकमतकुरखेडा : मुख्यमंत्र्यांच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ठ कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील ग्रामस्थांना वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनीवर सामुहिक वनहक्काचे शासनाचे पत्र तहसीलदार अजय चरडे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. त्यामुळे मालदुगी येथील ग्रामसभा सदस्य ३२५ हेक्टर वनजमिनीचे मालक बनले आहेत.अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी अधिनियम २००६ व नियम २००८ तथा सुधारणा नियम २०१२ अन्वये मालदुगी येथील ग्रामसभेने गावाच्या हद्दीतील वनजमिनीवर आपल्या जीवनोपयोगी दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तसेच कायद्यातील कलम ५ प्रमाणे अन्नसुरक्षेची खात्री करण्याबरोबरच वनांचा शाश्वत वापर करणे, जैवविविधतेचे संवर्धन करुन पर्यावरणाचा समतोल राखणे, सामुहिक वनसंपत्तीच्या प्रवेशाचे नियमन करण्याकरिता तसेच वन्यजीव, वने व जैवविविधता यांच्यावर प्रतिकुल परिणाम करणारी कोणतेही कामे थांबवण्याकरिता गावातीलच वनहक्क समितीकडे ३२५ हेक्टरच्या वनजमिनीवर सामुहिक वनहक्क दावा दाखल केला. वनहक्क समितीने सदर दाव्याची पडताळणी करुन ग्रामसभेत दावा मंजूर केला व उच्च स्तरीय समितीकडे कार्यवाहीसाठी पाठवला.२००७ पासून गावकरी वनहक्कासाठी संघर्ष करत होते. २०११ साली सार्वजनिक वनहक्क दावा वैयक्तिक नावाने मंजूर झाल्याने अडचण निर्माण झाली. सदर दावा रद्द करुन सुधारित वनहक्क दावा मिळावा यासाठी मालदुगी येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांनी पाठपुरावा केला. सदर सुधारित नमुन्यातील वनहक्क जिल्हास्तरीय वनहक्क समितीने २६ डिसेंबर २०१७ रोजी निर्गमित करुन ‘ग्रामसभा मालदुगी’ या नावाने मंजूर केला. तहसीलदार चरडे यांच्या हस्ते सामुहिक वनहक्काबाबतचे शासनाचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी मालदुगी ग्राम पंचायतीचे सरपंच यशवंत चौरीकर, उपसरपंच शितल मडावी, वनहक्क समितीचे अध्यक्ष श्रीराम गुरनूले, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन राऊत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम नैताम, ग्रा.पं.सदस्य अन्नाजी नैताम, गुलाब औरासे, सुरेखा सहारे, दर्शना राऊत, मिराबाई कोडापे, तलाठी किरंगे, वनरक्षक गोठा, ग्रामकोष समितीचे अरुण कुथे, गुरुदेव सेवा मंडळाचे तानाजी तिरपुडे, दमयंती चौरीकर, बाबुराव गाथे, व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सार्वजनिक वनहक्काबाबत नायब तहसिलदार मडावी यांनी मार्गदर्शन केले. ११ वर्षाच्या संघर्षानंतर वनहक्क मिळाल्याने गावकरी आनंद व्यक्त करित आहे.मालदुगी येथील मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अविनाश पोईणकर यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.