शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणीपंप उपलब्ध करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा ...

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : नागपूर येथील विधानभवन सभागृहात घेतला जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.नागपूर येथे विधानभवनाच्या मंत्री परिषद सभागृहात गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्य सचिव डी. के. जैन, अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पालक सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याला १ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १० जुलै अखेर ३ हजार ६६५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत तीन वर्षात १० हजार ८१७ कामे पूर्ण झाली. १८१ मालगुजारी तलाव दुरूस्त झाले. ३ हजार १३८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी आवास योजना यांच्या कामाला गती देण्यासाठी २९ अभियंते नियुक्त केले आहेत. गडचिरोली रेल्वे मार्गासाठी खासगी जमीन संपादीत करण्याचे काम वन विभागाची परवानगी मिळेपर्यंत थांबविण्याच्या सूचना रेल्वेतर्फे दिल्या होत्या. वन विभागाची परवानगी येत्या आठ दिवसात मिळाल्यानंतर या कामाला पुन्हा सुरूवात होईल, अशी माहिती वने व पालकसचिव विकास खारगे यांनी दिली.सुरजागड प्रकल्पातून लोहखनिजाच्या वाहतुकीचे काम स्थानिकांना मिळेल, यादृष्टीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी बैठकीदरम्यान सादर केले.१६ गावे सौरऊर्जेने प्रकाशलीसौरऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दुर्गम भागातील ४९ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी १६ गावे सौरऊर्जेने प्रकाशली आहेत. चिचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी केलेल्या धानाचे नुकसान टाळण्यासाठी २२ गोदामे बांधली जाणार आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीministerमंत्री