शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावा

By admin | Updated: July 23, 2016 01:59 IST

विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छ राहण्याबाबतचे धडे शिक्षकांनी द्यावे,

रवींद्र रमतकर यांचे आवाहन : गुणवत्ता कक्ष व नावीण्यपूर्ण उपक्रम कक्षाची बैठक गडचिरोली : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छ राहण्याबाबतचे धडे शिक्षकांनी द्यावे, तशा सवयी त्यांना पाडाव्या, असे आवाहन डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांनी केले. डायट येथे गुरूवारी जिल्हा गुणवत्ता कक्ष व नाविण्यपूर्ण उपक्रम कक्षाची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी राऊत, आकेवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. धनंजय चापले, डॉ. विनीत मत्ते, डॉ. नरेश वैद्य यांच्यासह जिल्हाभरातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व गुणवत्ता कक्षाचे सर्व सदस्य गण उपस्थित होते. सभेदरम्यान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमानुसार माहे जून २०१६ चा प्रक्रिया अहवाल जिल्ह्यातील सर्व शाळा स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी सहभागी करून घेणे, प्रत्येक शाळेत हँडवॉश स्टेशनची निर्मिती करणे, मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावणे, जिल्ह्यातील सर्व शाळांना डिसेंबर २०१६ पर्यंत प्रगत करणे, तालुक्याचा गुणवत्ता कक्ष अधिक सक्षम करून शाळांना सोयीसुविधा पुरविणे, शाळा सिद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, अप्रगत मुलांची केसस्टडी करून उपाययोजना करणे व त्यांना प्रगत करणे, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा डिजीटल व आयएसओ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे, प्रभावी नियोजन करून मुलांचा विकास साधने आदी मुद्यांवर सभेदरम्यान चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान प्राचार्य डॉ. रमतकर यांनी उपस्थित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक मूल प्रगत करणे ही त्या शिक्षकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी साखरे व माध्यमिक शिक्षणाधिकारी आत्राम यांनीसुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन डॉ. नरेश वैद्य तर आभार डॉ. विनीत मत्ते यांनी मानले. यशस्वीतेसाठी डायटच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)