गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाचे क्षेत्रफळ जास्त असल्याने वन्यजीव रक्षक पदेसुद्धा २ पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. त्याची वन विभागालाच मदत होईल; पण वन विभाग आपल्या विरोधात न जाणारे वन्यजीव सदस्य निवडतात हे पुन्हा एकदा या निवडीवरून सिद्ध झाले आहे. मागील सत्रातील वन्यजीव रक्षक पद हे याच दोन सदस्यांना देण्यात आले होते. यावर्षीसुद्धा त्याच सदस्यांची वर्णी लागल्याचे स्पष्ट झाले. सागवान लाकूड तस्करी, वन्यजिवांची शिकार, वनजमिनीवर अतिक्रमण या तीन मुद्द्यांवर कधीही आजपर्यंत कुठल्याही मानद वन्यजीव रक्षकांनी तक्रार कधीही केल्याचे दिसले नाही. बाहेर जिल्ह्यातील सदस्यांचे पद रद्द करून स्थानिकांना मानद वन्यजीव रक्षक पद देण्यात यावे. जमीन पातळीवर जो व्यक्ती कार्य करीत असते अशा व्यक्तीला नियुक्ती न देता वनविभागाची किंवा वरिष्ठ अधिकारी यांची हाजी हाजी करणाऱ्या व्यक्तीला वन विभाग नियुक्ती देत आहे, असा आराेप वन्यजीवप्रेमी रामू मादेशी यांनी केला आहे.
बाहेर जिल्ह्यातील नवनियुक्त मानद वन्यजीव रक्षक पद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST