शिवसेनेची बैठक : अरविंद कात्रटवार यांचे आवाहनगडचिरोली : शिवसैनिकांनी सदस्य नोंदणी अभियान शिस्तबद्ध पद्धतीने राबवून पक्ष बळकटीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केले. रविवारी तालुक्यातील बोदली येथे ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ या अभियानांतर्गत शिवसेनेची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला शिवसेनेचे गडचिरोली उपशहर प्रमुख संदीप दुधबळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख तेजस नरड, शिवसेना उपतालुका प्रमुख मिलींद भानारकर, योगेश कुळवे, राहूल सोरते, देवेंद्र निकुरे, बंडू नैताम, मनोज पिपरे, विकास नैताम, नीलेश मेश्राम, रूपेश वासेकर, महेंद्र पिपरे, चंद्रभान कोठारे, रवींद्र पिपरे, सुशील पिपरे, क्रिष्णा निकोडे, तुमदेव नैताम, उमेश्वर मोगरकार, रूपेश पिपरे, राजू निकोडे, भोजराज मोगरकार, होमराज लटारे, ताराचंद कुकुडकर, राजेंद्र जराते, अविनाश शेंडे, प्रकाश पिपरे, गजानन जराते, प्रफुल साखरे, उमेश खेवले, अमोल साखरे, गोपाल मांदाळे, प्रल्हाद धोडरे, भाग्यवान साखरे, भाष्कर रामटेके, गुड्डू मेश्राम, जीवन दाने आदी शिवसैनिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
पक्ष बळकटीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करा
By admin | Updated: September 21, 2016 02:36 IST