लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शहरातील मूलभूत समस्या सोडविण्याकरिता राज्य शासनाकडून नगर पंचायतीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.धानोरा नगर पंचायत क्षेत्रात पाण्याची समस्या, रस्ते, नाली, विद्युत व इतर महत्त्वाची कामे अद्यापही झालेली नाही. सदर कामे करण्याकरिता नगर पंचायतीला निधीची आवश्यकता आहे. सदर निधी राज्य शासनाकडून मिळवून दिल्यास शहरातील मूलभूत समस्या सोडविण्यास मदत मिळेल. राज्यात भाजप सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर तालुकास्तरीय ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. तसेच शासनाच्या वतीने अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. लोक हिताची कामे केली जात आहेत. परंतु धानोरा नगर पंचायतीला विकास कामे करण्याकरिता निधीची आवश्यकता आहे. सदर निधी मिळवून द्यावा, अशी मागणी भाजचे गटनेता विनोद निंबोरकर, नगरसेवक सुभाष धाईत यांनी केली.
विकास कामांकरिता निधी उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:59 IST
शहरातील मूलभूत समस्या सोडविण्याकरिता राज्य शासनाकडून नगर पंचायतीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
विकास कामांकरिता निधी उपलब्ध करा
ठळक मुद्देनिवेदन : न. पं. पदाधिकाºयांची मागणी