लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक तालुक्यामध्ये व गावामध्ये प्रवाशासाठी बांधलेल्या निवाºयांची दयनीय अवस्था झाली आहे. काही निवाºयांच्या भिंती कोसळल्या तर काही निवाºयांचे छत उडाले आहेत, काही निवाºयांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी काही निवाºयांमध्ये हॉटेल झाले आहेत तर काही निवारे खासगी वाहनांचे थांबे झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना निवाºयांच्या दुरवस्थेमुळे पावसातच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसने शहरात व तालुक्याच्या ठिकाणी रोज ये-जा करतात. यात महिला तसेच विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे. मात्र जिल्ह्यातील प्रवाशी निवारे नादुरुस्त असल्याने प्रवाशी वर्ग, शिक्षण घेण्यासाठी जाणारी मुले पानटपºयांच्या, हॉटेलच्या आडोशाला बसून पावसापासून स्वत:चा बचाव करतात. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. परंतु शासनही केवळ प्रवाशी निवारे बांधण्याचेच काम करीत असतो.स्थिती सर्वत्र सारखीचगडचिरोली तालुक्यासह धानोरा, चामोर्शी, आलापल्ली, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा या तालुक्याच्या ठिकाणी असलेले प्रवाशी निवारे पूर्णत: अस्वच्छ तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्याची देखील इच्छा होत नाही. जिल्ह्यातील प्रवाशी निवाºयांपैकी काहींच्या भिंती कोसळल्या तर काहींच्या भिंती जीर्ण आहेत. तर काही प्रवाशी निवाºयांचे छत उडाले असून ऐन पावसाळ्यात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
प्रवासी निवाºयांची देखभाल वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:03 IST
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक तालुक्यामध्ये व गावामध्ये प्रवाशासाठी बांधलेल्या निवाºयांची दयनीय अवस्था झाली आहे.
प्रवासी निवाºयांची देखभाल वाºयावर
ठळक मुद्देपावसाळ्यात प्रवाशांचे हाल : केवळ बांधकाम करण्याचेच शासनाचे काम