शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून जाणारे मुख्य मार्ग बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:00 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव व गडचिरोली-मूल हे तीन राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांरित करण्यात आले.

ठळक मुद्देराष्टÑीय महामार्ग प्राधिकरण सुस्त : चामोर्शी, आरमोरी मार्गावरील डांबरीकरण जागोजागी उखडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी, गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव व गडचिरोली-मूल हे तीन राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांरित करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून चामोर्शी-गडचिरोली, गडचिरोली-आरमोरी या मुख्य डांबरी मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात या मार्गावर खड्डे निर्माण झाले. त्यानंतर सदर मार्गाची प्राधिकरणाकडून थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली. पुन्हा जोरदार झालेल्या पावसाने हे मुख्य राष्टÑीय महामार्ग जैसे थे झाले. त्यानंतर स्थानिक नगर पालिका प्रशासनाने मुरूम व विटाची माती टाकून चामोर्शी मार्गावरील खड्डे बुजविले. आता खड्ड्यांचा आकार २ फूट खोल व ३ फूट रूंद असा झाला आहे. मोठ्या स्वरूपाचे खड्डे निर्माण झाल्याने बसमधील तसेच इतर खासगी वाहनातील प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.गडचिरोली शहरात बायपास मार्ग विकसित करण्यात आले नाही. त्यामुळे अहेरी, सिरोंचा, भामरागडकडे जाणारे ओव्हरलोड ट्रक चामोर्शी मार्गे आवागमन करतात. त्यामुळे मुख्य मार्गाची अशी दुरवस्था झाली आहे. आरमोरी व धानोरा मार्गाचीही अवस्था याहीपेक्षा दयनिय आहे.पोटेगाव बायपास मार्गावर जीवघेणे खड्डेस्थानिक इंदिरा गांधी चौकातून चामोर्शीमार्गे रेड्डी गोडाऊन परिसरातून पोटेगाव मार्गाला जोडणाºया रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या मार्गावरील मुलींच्या वसतिगृहासमोर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. सदर खड्डे सुरुवातीला मुरूम टाकून बुजविण्यात आले. त्यानंतर येथे डांबराची छुर्री टाकून सपाटीकरण करण्यात आले. मात्र जोरदार बरसलेल्या पावसाने मुरूम व छुर्री गायब केली. आता सदर खड्ड्यांचा आकार प्रचंड वाढला आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गावरील पथदिवे बंद झाल्यास वाहनधारकाचा अपघात या ठिकाणी निश्चित आहे. त्यामुळे या मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.