शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी मुख्य डांबरी मार्ग पुन्हा गेला खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चामोर्शी व इतर मुख्य रस्त्यावरील खड्डे काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून बुजविण्यात आले. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसाने चामोर्शीसह सर्वच मुख्य मार्गाच्या खड्ड्यावरील मुरूम गायब झाला आहे. पुन्हा शहरातील मुख्य डांबरी रस्ते खड्ड्याच्या विळख्यात सापडले ...

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चामोर्शी व इतर मुख्य रस्त्यावरील खड्डे काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून बुजविण्यात आले. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसाने चामोर्शीसह सर्वच मुख्य मार्गाच्या खड्ड्यावरील मुरूम गायब झाला आहे. पुन्हा शहरातील मुख्य डांबरी रस्ते खड्ड्याच्या विळख्यात सापडले आहेत. चामोर्शी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणावरून चामोर्शी, धानोरा, आरमोरी व चंद्रपूरकडे मुख्य मार्ग जातात. या मार्गाने दुचाकीसह सर्वच चारचाकी व जड वाहनांची दिवसभर वर्दळ असते. जड वाहनांच्या वर्दळीमुळे सदर मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली. चामोर्शी मार्गावरील डाक कार्यालयापासून शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गावरील बºयाच खड्ड्यांची खोली दीड ते दोन फूट आहे. आता पावसाचे पाणी खड्ड्यात साचले असल्याने वाहनधारकांना सायंकाळी व रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यातून वाहन गेल्यावर यातील घाणपाणी अंगावर उडत आहे.चामोर्शी मार्गाने आवागमन करणारी अनेक वाहने भंगार होण्याच्या मार्गावर आहेत. आरमोरी मार्गावर कठाणी नदीच्या अलिकडे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. शिवाय कठाणी नदीच्या पुलावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. या पुलाला कठडे नसल्याने येथे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाºया चंद्रपूर मार्गावरून तलावाकडून गोकुलनगरकडे जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील खोल खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विसापूर व विसापूर टोलीकडे जाणाºया मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कारमेल शाळेच्या मागील परिसरातील अंतर्गत रस्तेही चिखलाच्या विळख्यात सापडले आहे. चामोर्शी मार्गावरून पोटेगावकडे जाणारा मार्गही खड्डेमय बनला आहे. पोटेगाव मार्गावरील खड्डे काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आले. मात्र दमदार पावसाने पुन्हा खड्डे जैसे थे झाले.चामोर्शी मार्ग खड्डेमय बनल्यामुळे शाळकरी मुले, मुली व महिलांना दुचाकी नेण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वाराला अपघात होऊन किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. शहरातील वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने चामोर्शी मार्गावरील खड्ड्यांमध्ये बारीक चुरी टाकून खड्डे बुजवावे, सदर रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.महावितरणतर्फे भूमिगत विद्युत लाईन टाकण्याचे काम उन्हाळ्यात व्हायला पाहिजे होते. मात्र विलंब झाल्याने रस्ते बुजवूनही पावसाने खड्डे पुन्हा जैसे थे झाले. पालिकेच्या वतीने पोटेगाव बायपास, शिवाजी महाविद्यालयाकडून जाणारा बायपास व गोकूलनगर तलाव बायपास या तीन मार्गाचे काम मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया आटोपली आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेच विविध विकासकामे जोमात सुरू होतील. शहर विकासाबाबत आपण दक्ष व आग्रही आहोत.- योगीता पिपरे, नगराध्यक्ष, गडचिरोलीभूमिगत विद्युत लाईनमुळे रस्त्याची वाट

टॅग्स :Rainपाऊस