शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

कोतवाल भरतीत महिलाराज

By admin | Updated: July 3, 2014 23:34 IST

नक्षल्यांच्या दहशतीने एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक पोलीस पाटील, कोतवाल व ग्रामपंचायत सदस्यपदांची जबाबदारी स्विकारण्यास तयार नाही. मात्र याच तालुक्यातील पाच गावातील

जिल्ह्यातील पहिल्या कोतवाल : पाच महिलांची कोतवालपदी नियुक्तीरवी रामगुंडेवार - एटापल्लीनक्षल्यांच्या दहशतीने एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक पोलीस पाटील, कोतवाल व ग्रामपंचायत सदस्यपदांची जबाबदारी स्विकारण्यास तयार नाही. मात्र याच तालुक्यातील पाच गावातील महिला दहशतीची बंधने झुगारत पुढे आल्या. कोतवालपदी नियुक्ती झाल्यानंतर मनात कोणतीही भीती न बाळगता जबाबदारी स्विकारली आहे. त्यांच्या या ध्यैर्याची एटापल्ली तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आहे. मात्र छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यांमध्ये नक्षल्यांची दहशत अधिकच आढळून येते. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील अधिकांश गावांचा कारभार नक्षल्यांनी बनविलेल्या नियमांच्या आधारावर चालतो. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला नक्षली दहशतीचा सामना करावा लागतो. या भागात आपली दहशत कायम राहावी, यासाठी या गावांपर्यंत प्रशासनाच्या योजना व प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी पोहोचू नयेत यासाठी नक्षल्यांकडून नेहमीच चाल खेळली जाते. याअंतर्गतच महिन्यातून एखाद्या ग्रामपंचायत सदस्यावर, कोतवालावर, पोलीस पाटलावर किंवा सामान्य नागरिकावर पोलीस खबऱ्या असल्याचा आरोप लावून त्याचा खून केला जातो. नक्षल्यांच्या या दहशतीमुळे याठिकाणी प्रशासनाचे अधिकारी किंवा शासनाचे पदाधिकारी म्हणून कोणीच काम करण्यास तयार नाही. याचा परिणाम म्हणजे एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल पदाची अनेक पदे रिक्त आहेत. नक्षल्यांच्या या दहशतीमुळे युवकवर्ग व नागरिक नोकरी करण्यास तयार नसतांना पाच गावातील युवतींनी मात्र हिंमत बांधली. एटापल्ली तालुक्यात ८१ पदासाठी कोतवाल भरती घेण्यात आली. या भरतीत ३३ पेक्षा अधिक महिला उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी उडेरा येथील राजेश्वरी लक्ष्मीकांत शिवरकर, बुर्गी येथील अस्मिता लक्ष्मण दुर्गे, गट्टा येथील निता मंगू नवडी, कसनसूर येथील रूपाली मारोती सुरपाम, घोटसूर येथील जयश्री माधव गड्डमवार या पाच महिलांची निवड झाली. हे पाचही गाव नक्षलग्रस्त आहेत. तालुक्यात प्रथमच महिला कोतवाल झाल्याबद्दल पाचही जणींचा तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी तहसील कार्यालयात कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर नवनियुक्त कोतवालांची बैठक घेऊन तहसीलदारांनी त्यांना कामाचे स्वरूप पटवून दिले. युवकांच्या बरोबरीचे शिक्षण घेऊन देशभरातील महिला प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमावित आहेत. यात गडचिरोलीच्या दुर्गम भागात राहणाऱ्या युवतीही मागे नाही. त्यासुद्धा पुरूषाच्या बरोबरीने काम करू शकतात, हे दाखवून दिले आहे. समस्यांचे तुणतुणे वाजवत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढावा हे इतर युवतींनी शिकण्याची गरज आहे.