शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार..? पत्नी, आईचा काळीज पिळवटणारा हंबरडा

By संजय तिपाले | Updated: February 12, 2025 16:07 IST

पोलिस मुख्यालयावर फुटला अश्रूचा बांध

संजय तिपाले

गडचिरोली : 'कालपासून लेकरं विचारताहेत पप्पा कधी येणार, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही.. मी त्यांना काय उत्तर देऊ, तुम्हीच सांगा...' अशा काळीज हेलावणाऱ्या शब्दांत शहीद जवान महेश कवडू नागुलवार (वय ३९)यांच्या पत्नी पल्लवी यांनी टाहो फोडला अन् पोलिस अधिकारी-अंमलदारांसह नातेवाईकांही अश्रू अनावर झाले.

माओवाद्यांविरुध्दच्या चकमकीत वीरगती प्राप्त झालेले जवान महेश नागुलवार यांना शोकमग्न वातावरणात १२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

महेश  नागुलवार   हे २०१० मध्ये जिल्हा पोलिस दलात भरती झाले. सध्या सी- ६० या नक्षलविरोधी पथकात होते. भामरागड तालुक्यातील छत्तीसड सीमेलगतच्या दिरंगी, फुलणार जंगलात ते अन्य जवानांसह १० फेब्रुवारीला नक्षलविरोधी मोहिमेवर गेले होते. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी नक्षल व पोलिसांचा धुमश्चक्री सुरु झाली. तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीत महेश नागुलवार हे छातीत गोळी लागल्याने जखमी झाले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती केले, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. १२ रोजी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर पार्थिवदेह जिल्हा मुख्यालयात नेण्यात आला.

तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून महेश नागुलवार यांना आदंराजली वाहिली.अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष अभियान) राजकुमार व्हटकर, विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) संदीप पाटील, उप पोलिस महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागुलवार कुटुंबाचे सांत्वन केले. शहीद जवान महेश नागुलवार यांच्या आई कुंदा, पत्नी पल्लवी, आद्वी (वय ११) व आश्वी (वय ५) या दोन मुली व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे संपूर्ण वातावरण सुन्न झाले होते.माझा बापू कुठं गेला रे...महेश यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. आई कुंदा यांनी हिमतीने संसार सावरला. महेश यांनी पोलिस दलात भरती होऊन आईचे परिश्रम सार्थकी लावले, पण ऐन उमेदीच्या काळात त्यांना हौतात्य आल्याने कुटुंबावर आघात झाला. 'माझा बापू कुठं गेला रे... आम्ही कसे राहावे जी..' अशा शब्दांत आईने हंबरडा फोडला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी