शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

२ जुलैपासून जिल्ह्यात रक्तदानाचा महायज्ञ; ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक महिलांना प्रसूतीच्या वेळी रक्ताची गरज भासते. याशिवाय अपघातग्रस्त, सिकलसेलग्रस्त रुग्णांना अनेक वेळा रक्त द्यावे लागते. परंतु कोरोना काळात रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने आणि कोणत्यातरी निमित्ताने स्वत: रुग्णालयात जाऊन रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गरजवंतांना रक्त मिळणे कठीण होत आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा पुढाकार, सामाजिक संघटनांचे याेगदान; जिल्हावासीयांसाठी पुरेसा रक्तसाठा जमा हाेणार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी, राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात लोकमत समूहाच्या वतीने रक्तदानाचा महायज्ञ सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही २ ते १५ जुलै यादरम्यान विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या रक्तदान महायज्ञानिमित्त जारी करण्यात आलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या लोगोचे अनावरण केले.गडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अनेक महिलांना प्रसूतीच्या वेळी रक्ताची गरज भासते. याशिवाय अपघातग्रस्त, सिकलसेलग्रस्त रुग्णांना अनेक वेळा रक्त द्यावे लागते. परंतु कोरोना काळात रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने आणि कोणत्यातरी निमित्ताने स्वत: रुग्णालयात जाऊन रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गरजवंतांना रक्त मिळणे कठीण होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी लोकमतच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून या उपक्रम जिल्ह्यात ठिकठिकाणी राबविला जाणार आहे.आरमोरी येथील शिबिरासाठी जय दुर्गा मंडळाचे मनोहर मोटवानी, सुदाम मोटवानी यांनीही पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगत लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षात सामाजिक बांधिलकीलोकमतच्या वाटचालीला ५० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत लोकमतने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमतने पुढाकार घेत या उपक्रमाचे आयोजन केले आहे. उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ७४९९९०४७६४ या क्रमांकावर फोन करून आपल्या नावाची नोंदणी करावी.

 

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी