शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी अनिश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरी ही निवडणूक लढणारे स्थानिक कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीकता ठेवून असतात. त्यामुळे त्या पक्षाची ताकद, नेत्यांचे पाठबळ मिळून विजयश्री खेचून आणणे सुकर होण्यासाठी अनेक जण पक्षीय पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे ज्या गावात ज्याचा दबदबा आहे अशा नागरिकांना हेरून त्यांनाच आपल्या पक्षाकडून रिंगणात उतरवण्यासाठी काही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देमोर्चेबांधणी सुरू : इच्छुक उमेदवारांचे फिल्डींग लावणे सुरू

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १५ आणि १७ जानेवारी अशा दोन टप्प्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे लढण्याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे सध्यातरी या आघाडीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरी ही निवडणूक लढणारे स्थानिक कार्यकर्ते कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीकता ठेवून असतात. त्यामुळे त्या पक्षाची ताकद, नेत्यांचे पाठबळ मिळून विजयश्री खेचून आणणे सुकर होण्यासाठी अनेक जण पक्षीय पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे ज्या गावात ज्याचा दबदबा आहे अशा नागरिकांना हेरून त्यांनाच आपल्या पक्षाकडून रिंगणात उतरवण्यासाठी काही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचे वरच्या स्तरावर प्रयत्न आहेत. त्याची नगर पंचायत निवडणुकीत अंमलबजावणीही होण्याची शक्यता आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सूर जुळणे कठीणच असल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून येते. अशा स्थितीत ही निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रीत होण्याची शक्यता जास्त आहे. 

- तर इच्छुकांची गोची होणारनिवडणुकीसाठी शिल्लक असलेला कालावधी पाहता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून ३६२ ग्रामपंचायतीमधील उमेदवार निश्चित करणे जवळजवळ अशक्य आहे. तरीही आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे लढायचे असा निर्णय झाल्यास गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होणार आहे. 

स्थानिक संस्थांमध्ये भाजपचा दबदबाजिल्ह्याची एकूण स्थिती पाहता गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रासह स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा बऱ्यापैकी दबदबा आहे तर दक्षिण भागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक ठिकाणी वर्चस्व आहे. त्यामुळे वरकरणी भाजपशी जवळीकता ठेवणाऱ्यांसाठी ही निवडणूक अधिक सोपी राहील, असे मानले जाते.

विधान परिषदेतून झाली रंगीत तालीमनुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या वि.प.निवडणुकीत भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात त्या पराभवात गडचिरोली जिल्ह्याचा वाटा कमी असला तरी मतदारांचा कल कुणीकडे झुकत आहे याचा अंदाज या निवडणुकीतून आला. त्यामुळे भाजपच्या वर्चस्वाला धक्का तर लागणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेत वर्चस्वाची लढाईजिल्ह्यात सध्या शिवसेनेत कोणाचा पायपोस कोणात नाही. पदाधिकाऱ्यांनी वर्चस्वावरून एकमेकांविरूद्ध उघड बंड पुकारले आहे. कोण खरा आणि कोण खोटा, या संभ्रमात सामान्य शिवसैनिक पिचून गेला आहे. नेतृत्वावरून सुरू झालेल्या या गटबाजीचा सेनेला ग्रा.पं. निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक