शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

भाजपच्या गडावर आता महाविकास आघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस आणि शिवसेनेने जी व्यूहरचना केली, त्यातून या दोन्ही पक्षांनी यश खेचून आणले. त्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी मुलचेरा येथे अविरोध, तर कुरखेडा येथे भाजपचे प्राबल्य असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवून धमाल उडवून दिली. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाममात्र अस्तित्व असणाऱ्या सेनेने मारलेली ही मुसंडी पक्षाला बळकटी देणारी ठरणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींवर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतील पक्षांनी आणि विशेषत: काँग्रेस आणि शिवसेनेने आपला झेंडा फडकविला, ते पाहून जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलत असल्याची जाणीव सध्या होत आहे. गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यावर भाजपचे वर्चस्व आहे; पण नगरपंचायतींच्या निकालांनी या वर्चस्वाला सुरूंग लावला आहे. काँग्रेसचे नेते तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शन, नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दिलेले बळ यामुळेच या दोन्ही पक्षांनी सत्तेच्या दिशेने झेप घेतली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सतत पुढे जात असलेला भाजपचा विजयरथ  नगरपंचायतच्या निकालाने रोखला आहे. सात वर्षांत लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबत नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतही बऱ्यापैकी वर्चस्व निर्माण करण्यात भाजपला यश मिळाले आहे; पण राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेसोबत काँग्रेसनेही संघटनात्मक फेरबदल केले. विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस आणि शिवसेनेने जी व्यूहरचना केली, त्यातून या दोन्ही पक्षांनी यश खेचून आणले. त्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी मुलचेरा येथे अविरोध, तर कुरखेडा येथे भाजपचे प्राबल्य असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवून धमाल उडवून दिली. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाममात्र अस्तित्व असणाऱ्या सेनेने मारलेली ही मुसंडी पक्षाला बळकटी देणारी ठरणार आहे.दक्षिण गडचिरोलीत उदयास आलेल्या आदिवासी विद्यार्थी संघालाही या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. माजी आमदार दीपक आत्राम हे संस्थापक असले तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या खेळीमुळे मोठ्या पक्षांना मागे टाकत ‘आविसं’ने दोन ठिकाणचे नगराध्यक्षपद आणि तीन ठिकाणी उपाध्यक्षपद पदरी पाडून घेतले आहे.

काँग्रेसला नवसंजीवनीजिल्ह्यात कमजोर होत चाललेल्या काँग्रेस पक्षाला मंत्री विजय वडेट्टीवारांमुळे पुन्हा उभारी मिळत आहे. युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनीही नव्या दमाची फळी तयार करून काँग्रेसमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असली तरी त्याला आता फारसे महत्त्व न देता जुने- नवे पदाधिकारी सोबत काम करताना दिसत आहेत.

भाजप कुठे कमी पडली?

राज्यात सत्तेवरून दूर झाल्यानंतर भाजपला आपले प्रभावक्षेत्र टिकवून ठेवणे कठीण झाले. त्यात विरोधक जास्त सक्रिय झाल्यामुळे भाजपला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे खासदार, दोन आमदार असतानाही भाजपला अपयशाचा सामना करावा लागला आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक