महाराष्ट्राचे आराध्य व आद्यदैवत, बुध्दीची देवता गणरायाची स्थापना सोमवारी मोठ्या उत्साहात गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वदूर भागात करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात ४९३ सार्वजनिक, २ हजार ५०६ खासगी व १९२ गावात एक गाव एक गणपती अशा एकूण ३ हजार १९१ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. सोमवारी सकाळपासूनच गणेश मूर्तीला स्थापनेच्या ठिकाणी आणण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी व भाविकांनी लगबग सुरू केली होती. गडचिरोलीच्या बाजारात गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी गर्दी उसळली होती. पहिल्या छायाचित्रात आरमोरीच्या कुंभार मोहल्ल्यातील मूर्तीकाराच्या घरून स्थापनेच्या ठिकाणी गणेशमूर्ती उचलून नेताना सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व भाविक, दुसऱ्या छायाचित्रात गडचिरोली शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या सुरेश पोरेड्डीवार यांच्या घरी स्थापनेसाठी गणेशमूर्ती नेताना सुरेश पोरेड्डीवार व अन्य, तिसऱ्या छायाचित्रात आपल्या घरी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी दुचाकीने गणेशमूर्ती घेऊन जाताना कुटुंबीय.
महाराष्ट्राचे आराध्य व आद्यदैवत
By admin | Updated: September 6, 2016 00:49 IST