शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
3
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
4
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
5
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
6
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
7
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
8
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
9
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
10
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
11
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
12
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
13
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
14
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
15
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
16
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
17
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
18
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
19
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  

Maharashtra Election 2019 ; १९८१ मध्ये पहिल्यांदा झाला होता ईव्हीएमचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

ईव्हीएमचा वापर करण्यापूर्वी मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जात होती. मतदाराला मतपत्रिका उपलब्ध करून दिली जात होती. या मतपत्रिकेवर उमेदवाराचे चिन्ह राहत होते. चिन्हासमोर शिक्का मारून मतदान करावे लागत होते. मतदान केलेली मतपत्रिका एका पेटीत टाकल्या जात होत्या.

ठळक मुद्देकेरळमध्ये काही केंद्रांवर प्रयोग : २०१३ मध्ये आले व्हीव्हीपॅट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणूक प्रक्रिया अतिशय सुलभ व पारदर्शक करण्यात ईव्हीएमचा मोठा वाटा आहे. या ईव्हीएम मशीनचा पहिला प्रयोग १९८१ मध्ये केरळ राज्यातील परूर विधानसभा क्षेत्रात ५० मतदान केंद्रांवर करण्यात आला होता. आता त्यातही सुधारणा होऊन व्हीव्हीपॅटचा वापर गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झाला आहे.ईव्हीएमचा वापर करण्यापूर्वी मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जात होती. मतदाराला मतपत्रिका उपलब्ध करून दिली जात होती. या मतपत्रिकेवर उमेदवाराचे चिन्ह राहत होते. चिन्हासमोर शिक्का मारून मतदान करावे लागत होते. मतदान केलेली मतपत्रिका एका पेटीत टाकल्या जात होत्या. सदर पेट्या मोठ्या वाहनाच्या सहाय्याने मतमोजणी केंद्रांवर आणल्या जात होत्या. प्रत्येक मतपत्रिका उघडून मते मोजली जात होती. ही प्रक्रिया अतिशय किचकट, वेळखाऊ व कष्टप्रद होती.निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने ईव्हीएमची कल्पना मांडली. त्यानंतर प्रायोगीक तत्त्वावर ही यंत्रे वापरण्याचा निर्णय घेतला.१९८१ मध्ये केरळ राज्यातील उत्तर परवुर विधानसभा क्षेत्रात झालेल्या पोटनिवडणुकीत ५० मतदान केंद्रांवर ईव्हीएमचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. १९८२-८३ मध्ये विधानसभा मतदार संघामध्ये ईव्हीएमने मतदान घेण्यात आले. १९८४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करेपर्यंत ईव्हीएम मशीनचा वापर न करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर या यंत्राचा वापर स्थगित करण्यात आला. जानेवारी १९९९ मध्ये ईव्हीएमच्या वापराबाबत नेमलेल्या तज्ज्ञ समितीने अहवाल सादर केला. या अहवालात ईव्हीएमचा वापर करण्याची शिफारस केली. सन २००० नंतर प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमचा वापर सुरू झाला.२०१३ मध्ये व्हीव्हीपॅटचा वापरईव्हीएमच्या विश्वसनियतेबाबत काही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ईव्हीएमच्या कार्यपद्धतीची विश्वसनियता आणखी वाढविण्यासाठी ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडण्यात आले आहे. ४ सप्टेंबर २०१३ रोजी नागालॅन्ड मधील नोकसेन विधानसभा मतदार संघात सर्वप्रथम व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात आला. एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही प्रत्येक ईव्हीएमला व्ही.व्ही.पॅट जोडण्यात आले होते.