शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम, लग्न अन् विश्वासघात... मन हेलावून टाकणारी कथा ! बाळाच्या वाट्याला आले दुर्दैवी भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:03 IST

Gadchiroli : चुलत भावाच्या लग्नात बँडबाजाच्या पथकातील तरुणाशी तिची ओळख झाली. पहिल्याच भेटीत प्रेम जुळले. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देत त्याने तिच्याशी लग्नगाठ बांधली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चुलत भावाच्या लग्नात बँडबाजाच्या पथकातील तरुणाशी तिची ओळख झाली. पहिल्याच भेटीत प्रेम जुळले. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देत त्याने तिच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र, गर्भधारणा होताच हे नाते विश्वासघातात बदलले. पती अचानक गायब झाला. ना संपर्क, ना जबाबदारी. सासू-सासऱ्यांनीही पाठ फिरवली. आधार तुटलेल्या अवस्थेत तिने गोंडस बाळाला जन्म दिला; मात्र त्याचा सांभाळ करणे तिच्यासाठी अशक्य झाले. अखेर १५ डिसेंबर रोजी स्वतःच्या काळजावर दगड ठेवून तिने बालकल्याण समितीमार्फत या चिमुकल्याला शिशुगृहात दाखल केले. जन्मताच आई-वडिलांच्या मायेपासून दुरावलेल्या या बाळाची कथा मन हेलावून टाकणारी आहे.

एखाद्या चित्रपटालाही शोभेल अशी ही कथा. मीनाक्षी (काल्पनिक नाव) गडचिरोली तालुक्यातील एका खेडेगावातील तरुणी. मे २०२४ मध्ये चुलत भावाच्या लग्नात बँडबाजा वाद्य पथकातील चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील पवन (काल्पनिक नाव) याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांतच त्याने तिला पळवून नेले व १४ मे २०२४ रोजी गावातील मंदिरात मोजक्या नातेवाईकांत विवाह केला. रोजगाराचे साधन नाही तसेच आई- वडिलांची स्थिती बिकट असल्याने मीनाक्षीला बाळाचे संगोपन करणे अशक्य होते. अखेर जड मनाने १२ डिसेंबर रोजी ती गडचिरोली ठाण्याची पायरी चढली. पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तिला धीर दिला. बाल कल्याण समितीने या बाळाला शिशुगृहात पाठविले. निरोपावेळी तिला गहिवरून आले.

पती, सासू- सासऱ्यांचीही पाठ

इकडे पती कंपनीत कामाला गेल्याने मीनाक्षी गर्भावस्थेत आराम व्हावा यासाठी माहेरी आली. २ डिसेंबर २०२५ रोजी तिने जिल्हा महिला व बाल रुग्णालयात मुलाला जन्म दिला. सासरच्यांना ही बातमी दिली, मात्र पती पवन आणि सासू-सासरे कोणीही दवाखान्यात आले नाहीत. त्याचवेळी पवनने दुसऱ्या एका विवाहित महिलेशी लग्न केल्याची माहिती तिला कळाली. त्यामुळे मीनाक्षीच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नानंतर काही महिन्यांतच पवनचे खरे रूप समोर आले. भाजीपाला व्यवसायासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊ ये, असे म्हणत त्याने दारू पिऊन तिला मारहाण सुरू केली. परिस्थिती बदलेल या आशेने ती दिवस काढत होती. मीनाक्षी असतानाही त्याने छळ सुरुच ठेवला. जुलै २०२५ मध्ये 'हैद्राबाद येथे कंपनीत कामासाठी जातो' असे सांगून तो घरातून निघून गेला. नंतर तिने अनेकदा फोन केला तरी संपर्क झाला नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Love, Marriage, Betrayal: Heartbreaking Tale of Abandoned Child's Fate

Web Summary : A young woman, betrayed by her husband after pregnancy, faced abandonment and poverty. Unable to care for her newborn, she reluctantly placed him in an orphanage through the Child Welfare Committee. The father disappeared after marrying, leaving her helpless.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली