शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरीला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:11 IST

शासकीय किंवा खासगी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची दररोज बायोमेट्रिक यंत्राने हजेरी व्हावी यासाठी तीन वर्षांपूर्वी आदिवासी विकास आयुक्तालयाने यंत्रांचा पुरवठा केला, पण गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रांचा वापर होऊ शकला नाही.

ठळक मुद्देयंत्र कुचकामी : विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी तीन वर्षात एकदाही वापर नाही

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासकीय किंवा खासगी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची दररोज बायोमेट्रिक यंत्राने हजेरी व्हावी यासाठी तीन वर्षांपूर्वी आदिवासी विकास आयुक्तालयाने यंत्रांचा पुरवठा केला, पण गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रांचा वापर होऊ शकला नाही. यात विविध अडचणी असल्या तरी त्या अडचणींवर मात करण्यात गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला यश आलेले नाही.जिल्ह्यातील तीन आदिवासी प्रकल्प कार्यालयांपैकी सर्वाधिक २६ आदिवासी आश्रमशाळा गडचिरोली प्रकल्पात आहेत. याशिवाय १८ खासगी अनुदानित आश्रमशाळा आहेत. तसेच २१ शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह आहेत. परंतू सर्व ठिकाणी केवळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीच हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होते. अहेरी आणि भामरागड प्रकल्प कार्यालयांतर्गत कमी आश्रमशाळा असल्या तरी तिथेही वेगळी परिस्थिती नाही.आश्रमशाळा, वसतिगृह यातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती तपासण्यासाठी त्यांची बायोमेट्रिक पद्धतीने दररोज हजेरी घेण्याचे आदेश २०१५ मध्ये आदिवासी आयुक्त नाशिक यांनी काढले होते. त्यानंतर सर्व शासकीय आश्रमशाळांसाठी प्रत्येकी दोन यंत्र पाठविले. परंतू ते अपुरे पडले. त्यामुळे काही आश्रमशाळांमधील यंत्र परत बोलवून ते वसतिगृहांना देण्यात आले. काही दिवस विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याचा प्रयत्नही झाला. पण काही दिवसातच विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी असलेले यंत्र गुंडाळून ठेवण्यात आले.सध्या शिक्षक-कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकने होत असून त्याद्वारेच त्यांचे पगार काढले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीला आता आळा बसला आहे. परंतू किती विद्यार्थी गायब आहेत याची तपासणी होऊ शकत नसल्याने काही आश्रमशाळांमध्ये गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे. काही खासगी आश्रमशाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात.त्याला आळा घालण्यासाठी संबंधित संस्थांनी बायोमेट्रिक यंत्र खरेदी करून ते कार्यान्वित करण्याचे प्रकल्प कार्यालयाने सूचित केले असले तरी त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.४५ पैकी १९ यंत्र बंद स्थितीत२०१५ मध्ये आदिवासी आयुक्त नाशिक यांनी त्यांच्या स्तरावर बायोमेट्रिक यंत्र खरेदी करून पाठविले. परंतू त्या यंत्रांच्या देखभाल दुरूस्तीची कोणतीही सोय केली नाही. परिणामी शासकीय आश्रमशाळांमधील ४५ पैकी २६ यंत्र कार्यान्वित असून १९ यंत्र बंद अवस्थेत आहेत. नादुरूस्त असलेले यंत्र सुरू करण्याची सूचना प्रकल्प कार्यालयाने दिली आहे, पण अद्याप कोणीही त्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. शासकीय आश्रमशाळांना विविध खर्चासाठी वार्षिक २ लाख रुपये मिळतात. त्यामुळे आकस्मिक खर्च, कार्यालयीन खर्च किंवा शाळा व्यवस्थापन समितीच्या खर्चातून यंत्रांची दुरूस्ती केली जाऊ शकते. मात्र अद्याप तसे झालेले नाही.सुरूवातीला विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा प्रयत्न झाला. परंतू एकच यंत्र असल्यामुळे या प्रक्रियेत बराच वेळ जात होता. परिणामी केवळ शिक्षक व कर्मचाऱ्यांची हजेरी बायंोमेट्रिकने सुरू ठेवण्यात आली. मात्र तरीही जिथे यंत्र नाही त्या शाळांनी ते खरेदी करून विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याची सूचना केली आहे.- आर.के.लाडे,सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)

टॅग्स :Schoolशाळा