शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; दुसऱ्याही दिवशी काही पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:23 IST

नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला.

ठळक मुद्देहेलिकॉप्टर पोहोचले नाही : पोलीस मदत केंद्रात ठोकावा लागला मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला.पोलिंग पार्ट्यांना वाहनाने पोहोचविण्याचा धोका लक्षात घेऊन निवडणूक विभागाने त्यांना हेलिकॉप्टरने पोहोचविले होते. या कामासाठी चार हेलिकॉप्टर वापरण्यात आले. पोलीस मदत केंद्राच्या ठिकाणी बेस कॅम्प होते. या मदत केंद्राच्या परिसरातच हेलिपॅड तयार करण्यात आले होते. देसाईगंज, गडचिरोली व अहेरी येथून कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविले जात होते. तेथून मतदान केंद्राच्या गावापर्यंत पोलिंग पार्टीला पोलीस संरक्षणात पायीच नेण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रांचा दुपारी ३ वाजताच गाशा गुंडाळण्यात आला. त्यानंतर संबंधित पोलिंग पार्टीला सायंकाळ होण्याच्या आधी बेस कॅम्पपर्यंत पोहोचविण्यात आले.दुसºया दिवशी सकाळी आपण हेलिकॉप्टरने देसाईगंज किंवा अहेरी येथे पोहोचू, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी होती. मात्र हेलिकॉप्टर न आल्याने काही पोलिंग पार्ट्यांना बेस कॅम्पवरील पोलीस मदत केंद्रात थांबावे लागले. सावरगाव, गॅरापत्ती येथील पोलिंग पार्ट्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत बेस कॅम्पवरच थांबल्या होत्या. त्यामुळे ते कर्मचारी शनिवारी सकाळी पोहोचतील, अशी शक्यता आहे. ज्या पोलीस मदत केंद्रांवर कर्मचारी थांबले होते त्यांची पूर्ण व्यवस्था पोलिसांच्या मार्फत करण्यात आली होती, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वादळ वाºयासह पाऊस झाला. यावेळी बहुतांश कर्मचारी तालुकास्तरावर पोहोचले होते. मात्र वादळ वाऱ्याचा त्रास या कर्मचाºयांना सहन करावा लागला. काही कर्मचाऱ्यांना घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे १२ वाजले.आगाऊ फिरविण्यामुळे कर्मचारी त्रस्तनक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना पोलीस संरक्षणात पायीच नेण्यात आले. मात्र गाव जवळच असताना त्यांना फेरा मारून संबंधित मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. फेरा मारून नेण्यामागे पोलिसांच्या सुरक्षेच्या रणनितीचा भाग असला तरी १० ते १५ किमीपर्यंत चालून पोलिंग पार्टीतील कर्मचारी व अधिकारी थकले होते. अहेरी तालुक्यातील मरपल्ली हे गाव अहेरीपासून जवळ आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना बसने सर्वप्रथम सिरोंचा येथे नेण्यात आले. त्यानंतर परत मरपल्ली येथे सोडण्यात आले. अनेक कर्मचारी ४० पेक्षा जास्त वयाचे असल्याने त्यांना चांगलाच त्रास झाला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019