शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; जाहीर प्रचार आज थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:46 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघात जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी (दि.९) दुपारी ३ वाजता संपणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदार संघात ही मुदत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. दरम्यान मतदान करणे सोपे जावे यासाठी जिल्ह्यातील साडेसात लाख मतदारांपर्यंत मतदार पावत्या आणि मतदानासाठी आवश्यक असलेल्या १२ पैकी कोणत्याही एका ओळखपत्राबाबतची यादी असलेले पोस्टकार्ड पोहोचविणे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा सज्ज : सर्व मतदारांना घरपोच स्लिप, पोस्टकार्डमधून दिली कागदपत्रांची यादी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघात जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी (दि.९) दुपारी ३ वाजता संपणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदार संघात ही मुदत सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. दरम्यान मतदान करणे सोपे जावे यासाठी जिल्ह्यातील साडेसात लाख मतदारांपर्यंत मतदार पावत्या आणि मतदानासाठी आवश्यक असलेल्या १२ पैकी कोणत्याही एका ओळखपत्राबाबतची यादी असलेले पोस्टकार्ड पोहोचविणे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.११ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हाभरात मतदार जागृती करणे सुरू आहे. ९६ कॉलेजच्या विद्यार्थ्यामार्फत मतदारांच्या घरी जाऊन जनजागृती केली जात आहे. यासोबतच जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा, बाइक रॅलीचेही आयोजन केले होते.११ एप्रिलला सार्वजनिक सुटीलोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ११ एप्रिल रोजी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील विविध आस्थापना (अत्यावश्यक सेवा वगळून) कारखाने, निवासी हॉटेल्स, मॉल्स, दुकाने किंवा इतर आस्थापनांना सार्वजनिक सुटी राहणार आहे. ही आस्थापने सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवावीत. तसेच त्या दिवशी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये असेही शासनाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण सुटी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.कर्मचाऱ्यांसाठी बस व्यवस्थाजिल्ह्यातील भामरागड, मुलचेरा, आष्टी, असरअली, सिरोंचा, कसनसूर व एटापल्ली या तालुका किंवा मुख्य केंद्र ठिकाणावरून येणाºया मतदान कर्मचाऱ्यांना ९ एप्रिल रोजी अहेरीपर्यंत येण्यासाठी १२ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सर्व संबंधित कर्मचाºयांनी निर्देशित वेळी उपस्थित रहावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले.जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात ७ लाख ५० हजार मतदारांना मतदार पावती (व्होटर स्लिप) वितरित करण्याचे काम कर्मचाºयांकडून सुरू आहे. त्या पावतीवर मतदारांचा फोटोही आहे. मतदानाच्या वेळी त्या पावतीसोबत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ११ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र आणने आवशयक आहे. त्याबाबतची माहिती पोस्ट कार्डच्या माध्यमातून मतदारांना दिली जात आहे.हे पोस्ट कार्ड मराठीसोबतच बंगाली, माडिया आणि तेलगू अशा चार भाषांमध्ये छापण्यात आले आहेत. मुलचेरा आणि चामोर्शी तालुक्यातील मतदारांसाठी बंगाली भाषेतील कार्ड तर एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि धानोरा तालुक्यातील माडियाबहुल क्षेत्रातील मतदारांना माडिया भाषेतील कार्ड दिले जात आहे. सिरोंचा तालुका आणि परिसरातील मतदारांना मराठी आणि तेलगू भाषेतील कार्ड वितरित केले जात आहेत.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर