शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Lok Sabha Election 2019; मोटरसायकल व पायदळ रॅलींनी प्रचाराची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:07 IST

लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीची मंगळवारी दुपारी ३ वाजता सांगता झाली. तत्पूर्वी निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीच्या आणि भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून शहरवासीयांना शेवटचे आवाहन केले.

ठळक मुद्देअनेक कर्मचारी केंद्रासाठी रवाना : आजचा दिवस आणि रात्रही महत्वाची

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीची मंगळवारी दुपारी ३ वाजता सांगता झाली. तत्पूर्वी निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस महाआघाडीच्या आणि भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून शहरवासीयांना शेवटचे आवाहन केले. काँग्रेसतर्फे मोटारसायकलवरून तर भाजपने पायदळ रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.जाहीर प्रचाराची सांगता झाली असली तरी निवडणुकीची खलबते मात्र वाढली आहेत. मतदारांना आमिष देऊन आपल बाजुने वळविण्याचे प्रयत्न बुधवारी दिवसभर आणि रात्रभरही सुरू राहणार आहेत. मात्र यावेळी ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी वाढल्यामुळे उमेदवारांची अडचण होत आहे.दरम्यान निवडणूक विभागाने मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण करून मंगळवारी काही संवेदनशिल मतदान केंद्रांवरच्या कर्मचाऱ्यांना ठिकठिकाणच्या बेस कॅम्पवर रवाना केले. उद्या ते कर्मचारी संबंधित मतदान केंद्रांवर रवाना होतील. या निवडणुकीच्या कामात संपूर्ण मतदान संघात एकूण ८ हजार २५० कर्मचारी लागणार आहेत. विविध सुरक्षा दलांचा बंदोबस्त लावला आहे.पथकांच्या वाहतुकीसाठी ५८ बसगाड्यामतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या पथकांची ने-आण करण्यासाठी निवडणूक विभागाने ५८ बसेस भाड्याने घेतल्या आहेत. यामध्ये गडचिरोली आगाराच्या ४२ तर अहेरी आगाराच्या १६ बसेसचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे व त्यांना परत आणण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची आहे. ९ एप्रिल ते जवळपास १२ एप्रिलपर्यंत बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाने ५६ रुपये प्रतीकिलोमीटर दराने बस उपलब्ध करून दिल्या आहेत.केंद्राच्या ठिकाणी १४४ कलम लागूनिवडणूक भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ९३५ मतदान केंद्रांचे १०० मिटरच्या परिसरात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात एकत्रित जमण्यासह विविध प्रकारची बंधने राहणार आहेत.नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे- सिंहमतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदान हा सर्वात मौल्यवान हक्क दिला आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावायलाच हवा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर