शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; निवडणुकीमुळे मजुरांना सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:22 IST

गेल्या आठवडाभरापासून निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत आहे. निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रचार साहित्य बनविणाऱ्या कारागिरांना यामुळे काही दिवसासाठी का असेना, चांगले दिवस आले आहेत.

ठळक मुद्देव्यावसायिकांची चांदीगर्दी वाढविण्यासाठी महिलांनाही मिळणार रोजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला पुढील दोन दिवसात वेग येणार आहे. गेल्या आठवडाभरापासून निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत आहे. निवडणुकीसाठी लागणारे विविध प्रचार साहित्य बनविणाऱ्या कारागिरांना यामुळे काही दिवसासाठी का असेना, चांगले दिवस आले आहेत. शिवाय ग्राफिक्स, प्रिंटींग प्रेस, डेकोरेशन, वाहने आदीसह विविध साहित्य निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणार असल्याने या व्यावसायिकांची सध्या चांदी आहे. एवढेच नाही तर उमेदवारांच्या प्रचारसभेत गर्दी जमविण्यापासून तर प्रचार साहित्य वाटपापर्यंत भाडोत्री कार्यकर्ते म्हणून महिला व पुरूषांना बोलविले जाणार असल्याने आगामी ८-१० दिवस हजारो नागरिकांना रोजगार मिळणार आहे.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी पहिल्या टप्प्या ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह इतरही पक्षातील उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. निवडणूक प्रचारासाठी आपापल्या पक्षातील मोठे नेते, स्टार प्रचारक आदींचे बॅनर बनवून प्रचार कार्यालयाच्या आसपास लावण्यात आले आहेत.नामांकन रॅलीसाठी हजारो कार्यकर्ते व नागरिकांना गडचिरोलीत आणण्यात आले. यासाठी प्रमुख दोन्ही पक्षांना शेकडो वाहनांची व्यवस्था करावी लागली. ठिकठिकाणच्या प्रचार सभांसाठी अशा पद्धतीने वाहने, बॅनरची गरज भासणार आहे.निवडणुकीच्या निमित्ताने खासगी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्यासह तालुकास्तरावरही प्रमुख राजकीय पक्षाच्या वतीने मिनी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे तालुकास्तरावरील डेकोरेशन व्यावसायिकांचा धंदा आता वाढला आहे.निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जिल्हा व तालुका मुख्यालयी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याने हॉटेल तसेच भोजनालय चालविणाऱ्यांचा व्यवसाय वाढला आहे. याशिवाय प्रचार कार्यालय परिसरातील चहा व्यावसायिकांनाही फुरसत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या प्रचारासाठी महिलांनाही बोलाविण्यात येणार असल्याने या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

रोहयो व इतर कामांवर परिणामग्रामीण भागातील बहुतांश पुरूष व महिला रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणारे नोंदणीकृत मजूर आहेत. गेल्या महिनाभरापासून हे मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर जात आहेत. मात्र आता निवडणूक प्रचारासाठी प्रमुख राजकीय पक्षाला सर्वसामान्य नागरिकांसह मजुरांचीही गरज भासणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या जिल्हा व तालुकास्तरावर प्रचारसभा होणार आहेत. या प्रचारसभेत कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी गर्दी उमेदवार तसेच पक्षश्रेष्ठींना अपेक्षित असते. त्यामुळे राजकीय पक्षातर्फे गर्दी जमविण्यासाठी महिलांना सभास्थळी बोलाविले जाते. सभेला गर्दी करण्यासाठी येणाऱ्या महिलांना प्रतीदिवस मजुरी म्हणून २०० रुपये दिले जातात. प्रचारकार्यात बहुतांश मजूर व्यस्त राहत असल्याने रोजगार हमी व इतर बांधकामावर मजूर जात नाही. परिणामी रोहयो तसेच इतर इमारत बांधकामे निवडणूक काळात प्रभावित होणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक