शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच सर्वाधिक मतदानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:08 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देअहेरी उपविभागात घटले : पाच मतदारसंघात वाढले, सरासरी गेली ७१.७७ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. काही मतदान केंद्रावरचे कर्मचारी मुख्यालयी पोहोचणे बाकी आहेत. ते पोहोचल्यानंतरच त्यांच्या केंद्रावरील मतदानाचा आकडा घेऊन निश्चित टक्केवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. नक्षल घटनांच्या पार्श्वभूमीवर वाढलेले हे मतदान लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वाढविणारे ठरले आहे.या लोकसभा मतदार २०१४ च्या निवडणुकीत ६९.९५ टक्के मतदान झाले होते. तो आकडा यावेळी पार करून मतदान ७२ टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहे. यात अहेरी विधानसभा क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. परंतू अहेरी क्षेत्रात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हिंसक घटनांमुळे, तसेच एटापल्ली तालुक्यात ४ मतदान केंद्र सुरूच झाले नसल्यामुळे मतदानाचे प्रमाण घटले. मतदानापासून वंचित राहिलेल्या त्या चार केंद्रांवरील नागरिकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळाल्यास या क्षेत्रातील मतदानाचा आकडा आणखी वाढू शकेल.एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या दक्षिणेकडील चार तालुक्यांसह गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची, कुरखेडा या तालुक्यांतही नक्षलवाद्यांचे सावट आहे. नक्षलवाद्यांचा मतदान प्रक्रियेला विरोध असतो. तरीही त्या भागात मतदानाचे प्रमाण वाढले असल्यामुळे नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ होत असल्याचे दिसून येते. यावेळी मतदानाबाबत जनजागृती करण्यातही प्रशासनाने कसर सोडली नाही. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019