शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; वणव्यामुळे दुर्गम भागातील वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:14 IST

एटापल्ली ते भामरागड दरम्यानची वीज लाईन जंगलातून गेली आहे. जंगलाला आगी लावल्या जात आहेत. या आगीमुळे वाढलेले झाड वीज तारांवर कोसळत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देअनेक गावे अंधारात : आठ दिवसांपासून गावकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : एटापल्ली ते भामरागड दरम्यानची वीज लाईन जंगलातून गेली आहे. जंगलाला आगी लावल्या जात आहेत. या आगीमुळे वाढलेले झाड वीज तारांवर कोसळत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत. मागील आठ दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.भामरागड येथील सबस्टेशनला एटापल्ली तालुक्यातून वीज पुरवठा केला आहे. या सबस्टेशनवरून भामरागड व अहेरी तालुक्यातील काही गावे जोडण्यात आली आहेत. एटापल्ली ते भामरागडपर्यंतची वीज लाईन जंगलातून टाकली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्यानंतर एखादे झाड कोसळून वीज पुरवठा खंडीत होतो. मात्र सद्य:स्थितीत वादळ वारा नसतानाही वीज पुरवठा खंडित होत आहे. आठ दिवसांपासून सातत्याने वीज पुवठा खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.एप्रिल महिन्याला सुरूवात झाल्याने जंगलाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आगीदरम्यान वीज तारांजवळचे एखादे सुकलेले झाड जळून ते तारांवर कोसळते. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होत आहे. ज्या ठिकाणी झाड कोसळले, त्याच्या पुढच्या गावांचा वीज पुरवठा खंडीत करून केला जात आहे. या घटनांवर वीज कर्मचारी सातत्याने लक्ष देऊन आहेत, अशी माहिती महावितरणचे अभियंता पाटील यांनी दिली आहे.एटापल्ली तालुक्यातून भामरागड तालुक्यातील गावांबरोबरच अहेरी तालुक्यातील गावांनाही विजेचा पुरवठा केला जातो. त्यामुळे सततच्या वीज पुरवठ्याने अहेरी तालुक्यातील जंगलव्याप्त गावांमधील नागरिकरही त्रस्त झाले आहेत.पोलिंग पार्ट्यांनाही फटका११ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. भामरागड तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्र दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडतात. त्यामुळे पोलिंग पार्ट्या मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीच आणून ठेवल्या जातात. त्याचबरोबर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तालुकास्तरावर नेले जाते. त्यामुळे किमान तीन दिवस पोलिंग पार्टीचा गावात मुक्काम राहणार आहे. अशातच गावात अंधार राहात असल्याने याचा त्रास पोलिंग पार्टीलाही होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019