शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

Lok Sabha Election 2019; काँग्रेस उमेदवार उसेंडी यांच्या मालमत्तेच्या माहितीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 21:26 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे.

ठळक मुद्देमाहिती लपविल्याचा आरोपउमेदवारी रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे. त्यांनी खोटी माहिती सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.सदर तक्रारीनुसार २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी डॉ.उसेंडी यांनी सादर केलेल्या शपथपत्रात आपले मालमत्तेचे विवरण नमूद करताना मौजा रामपूर तुकूम, भूमापन क्र.४७ व इतर, क्षेत्र १९५.२० चौ.मी. ही जागा दि.१९ डिसेंबर २०११ रोजी स्वत: खरेदी केली. त्यावेळी त्या जमिनीची किंमत २४ लाख ५४ हजार १४५ रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. शिवाय त्या जमिनीवर विकास बांधकाम इत्यादीच्या रुपाने कोणतीही गुंतवणूक केली नसल्याचे म्हटले आहे.परंतू २०१९ च्या निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात ती जमीन १९ डिसेंबर २०११ ऐवजी दुसऱ्याच तारखेला खरेदी केल्याचे नमूद आहे. याशिवाय त्या जमिनीची खरेदीच्या वेळी असलेली किंमत २०१४ मध्ये दाखविलेल्या खरेदी किमतीपेक्षा कितीतरी कमी म्हणजे २ लाख २० हजार आणि १ लाख ९५ हजार अशी दाखविली आहे. दोन्ही निवडणुकांच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रातील माहितीत असलेल्या फरकामुळे शंका उत्पन्न होत असून त्यांनी आताच्या शपथपत्रात खरेदी मूल्य कमी दाखवून संपत्ती लपविली आहे.विशेष म्हणजे २०१४ च्या शपथपत्रात डॉ.उसेंडी यांनी मुंबईच्या वरसोवा, राजयोग बिल्डींग येथील भू.क्र.१३७४/१ क्षेत्रावरील सदनिका दि.२० एप्रिल २०११ रोजी ४२ लाख ४६ हजार रुपयांत खरेदी केल्याचे नमूद आहे. परंतू आताच्या (२०१९) शपथपत्रात त्याबाबत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे ती संपत्ती त्यांनी लपवून बनावट शपथपत्र दाखल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.विशेष म्हणजे ती सदनिका त्यांनी विक्री केली असेल तर त्याबाबतचा कोणताही उल्लेख केलेला नाही. गेल्या ५ वर्षाच्या आयकर विवरणपत्रातही त्याबाबतची माहिती नाही. त्यामुळे उसेंडी यांच्यावर खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी निवडणूक लढण्यास अपात्र ठरवण्याची कारवाई करण्याची मागणी बांबोळे यांनी केली आहे.

मुंबईमधील तो फ्लॅट विकला आहे. त्यातून अंगावरील ७६ लाखांचे कर्ज फेडले आहे. त्यामुळे आयकर विवरण पत्रात त्याची रक्कम दिसत नसेल. फ्लॅटच राहिला नसल्यामुळे त्याबाबत आताच्या शपथपत्रात नमूद करण्यात आलेले नाही.- डॉ.नामदेव उसेंडी, उमेदवार, काँग्रेस

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019