शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गेवर्धा येथील विश्रामगृहाची दुरवस्था

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

तालुक्यातील गेवर्धा येथील विश्रामगृहाची आठ वर्षापूर्वी नक्षल्यांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर या विश्रामगृहाची दुरूस्ती केली नसल्याने सदर विश्रामगृह मोडकळीस आले आहेत.

कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा येथील विश्रामगृहाची आठ वर्षापूर्वी नक्षल्यांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर या विश्रामगृहाची दुरूस्ती केली नसल्याने सदर विश्रामगृह मोडकळीस आले आहेत. विश्रामगृह दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेवर्धा येथे विश्रामगृह बांधले आहे. यापरिसरात येणारे अनेक शासकीय अधिकारी या ठिकाणी मुक्कामास राहत होते. मात्र २६ जानेवारी २००६ रोजी गणतंत्रदिनी नक्षल्यांनी हे विश्रामगृह जाळून टाकले. तेव्हापासून या विश्रामगृहाची दुरूस्ती करण्यात न आल्याने विश्रामगृह मोडकळीस आले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने विश्रामगृहाची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. इमारतीवरील कवेलू फुटले आहेत. लाकडी फाट्यांनी वाळवी लागली आहे. सततच्या पावसामुळे फाटे कुजण्याच्या मार्गावर आहेत. नक्षल्यांनी आग लावल्यानंतर विश्रामगृहातील आतील भाग जळाला. त्यामुळे भिंती काळवंटल्या आहेत. या विश्रामगृहाची साफसफाई केली जात नसल्याने सगळीकडे घाण पसरली आहे. इमारतीची डागडुजी केल्यास इमारत राहण्यासाठी कामी येऊ शकते. गेवर्धा येथे असलेले विश्रामगृह गेवर्धावासीयांसाठी एक अभिमानाची बाब होती. कुरखेडा परिसरात आलेले अधिकारी किंवा कर्मचारी सायंकाळी उशीर झाल्यानंतर याच ठिकाणी मुक्कामाने राहत होते. विश्रामगृहात राहण्याच्या निमित्याने नेहमी अधिकारी येत असल्याने गेवर्धावासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली होती. मात्र विश्रामगृह जळाल्यानंतर गेवर्धा येथे अधिकाऱ्यांचे येण्याचे प्रमाण अगदी नगण्य झाले आहे. आणखी काही दिवस या इमारतीची डागडुजी करण्यास विलंब झाल्यास इमारतीचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डागडुजीसाठी अत्यंत कमी खर्च येणार असतांनाही प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर इमारतीची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी. जेणे करून या परिसरात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशाच प्रकारच्या जिल्हाभरातील शेकडो इमारतींकडे दुर्लक्ष झाले आहे.