शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

जिल्ह्याबाहेरील शिक्षकांच्या निवडीवर स्थानिकांचा आक्षेप; आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 15:34 IST

निवेदन: शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : कंत्राटी शिक्षक भरतीत जिल्ह्यातीलच उमेदवारांना प्राधान्यक्रमाने समावून घेण्याचे आदेश दिले असतानाही जिल्ह्याबाहेरील उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने जिल्ह्यातील उमेदवारावर अन्याय झाला आहे. या नियुक्त्त्या तत्काळ रद्द करीत जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्यक्रमाने समावून घेण्यात यावे या मागणीचे निवेदन बेरोजगार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी कुरखेडामार्फत शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

जिल्ह्यात नुकतीच कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरतीत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार असतानाही जिल्ह्याबाहेरील १८९ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. जिल्ह्यात डीएड, बीएड, उत्तीर्ण अनेक युवक-युवती बेरोजगार आहेत. मात्र, आयुक्तांचा आदेश डावलत शिक्षण विभागाने जिल्ह्याबाहेरील उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या रद्द करीत स्थानिक डीएड, बीएड उत्तीर्ण उमेदवारांना टीईटीची अट रद्द करीत नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अंकुश कोकोडे, भास्कर ठलाल, चरण बंसोड, वंदना कवरके, पौर्णिमा सहारे, धनंजय पालीवाल, रमेश कवरके, प्रियंका कोरेटी, सुप्रिया नैताम, मिथुन ठलाल, रूपेश शिवरकर, मोनाली गहाणे, निकिता मोहुर्ले, लंकेश मेश्राम, अल्का बंसोड, कांचन सहारे, नास्तिक पंधरे, रेखा पंधरे, टोकेश लाडे, महेश गहाणे, ललिता मेश्राम, गणेश मेश्राम, हितेश ठलाल उपस्थित होते. 

आंदोलनाचा इशारा स्थानिक उमेदवारांना डावलून जर दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती दिली जात असेल तर हा अन्याय आहे. याविरोधात जिल्ह्यातील बेरोजगारांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांची नियुक्त्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली