शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महामंडळाकडून व्यवसायासाठी ५० लाखांपर्यंत कर्ज; शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:09 IST

Gadchiroli : ओबीसी महामंडळाकडून कर्ज उपलब्ध होत असल्याने युवांना स्वयंरोजगार थाटता येतो

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ युांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मागील काही वर्षांत अनेक युवांना महामंडळाने कर्ज उपलब्ध केले आहे. 

गट कर्ज व्याज परतावा योजना (५० लाखांपर्यंत)वार्षिक उत्पन्न मर्यादितील उमेदवाराच्या बचत गट, भागीदारी संस्था सहकारी संस्था अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता जे कर्ज दिले जाते. बँकेकडून प्रत्येक गटात कमीत कमी रुपये १० लाख ते जास्तीत जास्त ५० लाख रुपयांपर्यंतची मंजुरी उद्योग उभारणीकरिता आहे. 

थेट कर्ज योजना (१ लाख)या योजनेंतर्गत लघु उद्योग सुरू करण्यासाठी १ लाखाचे बिनव्याजी थेट कर्ज दिले जाते. या योजनेत नियमित परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना 'दसादसे' ४ टक्के व्याज आकारण्यात येते. ४ वर्षांत कर्ज परतफेड करावी लागते. तेव्हाच बिनव्याजी थेट कर्ज योजनेचा सुलभ लाभ मिळतो. 

शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्जइतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी १० लाख व परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. विद्यार्थ्यांचे वय १७ ते ३० वर्षे, वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत असावे. अर्जदार इयत्ता १२ वी ६० गुणांसह उत्तीर्ण असावा. 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (१५ लाखांपर्यंत)या योजनेचे स्वरूप बँकेने १५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बैंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार आहे.

२० टक्के बिजभांडवल योजना (५ लाखांपर्यंत) :

  • या योजनेंतर्गत कमाल ५ लाख रुपया चर्चतध्या का प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपरिक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल.
  • मंजूर कर्ज रकमेच्या ५ टक्के २ लाभार्थी, २० टक्के महामंडळ व ७५ टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर ६ टक्के व्याज दर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याज दर लागू राहील. कर्जाची परतफेड ५ वर्षात करायची आहे.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली