शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

जिल्हा बँक देणार बांबू लागवडीसाठी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ होत असून विविध तंत्रज्ञानाचा वापर ...

ठळक मुद्देमोबाईल बँकिंग सुविधा : तंत्रज्ञानाच्या वापरात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ होत असून विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ही बँक राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांत दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या बँकेकडून आता जिल्ह्यातील शेतकºयांना धानाला पर्याय म्हणून बांबू लागवडीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी दिली.बँकेच्या सभागृहात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी बँकेच्या विविध ग्राहकोपयोगी सुविधांची माहिती देण्यासोबतच आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर आणखी कसा वाढविला जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर, उपव्यवस्थापक हर्षवर्धन भडके उपस्थित होते.शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून आतापर्यंत १८ हजार रोपांचे वाटपही झाले असल्याचे पोरेड्डीवार यांनी सांगितले. बँकेच्या स्थापनेला ३३ वर्षे झाली. त्यावेळी ७ कोटीवर सुरू झालेल्या बँकेची उलाढाल आता २ हजार कोटींवर पोहोचली. येत्या ३१ मार्चपर्यंत ही बँक २५०० कोटींचा पल्ला गाठेल, असा विश्वास यावेळी सीईओ सतीश आयलवार यांनी व्यक्त केला. याशिवाय इंटरनेट बँकींगची सुविधा येत्या वर्षभरात मिळेल, असेही त्यांनी सांगितले.भविष्यात इथेनॉलचा प्रकल्पपेट्रोलला पर्याय ठरणार असलेल्या इथेनॉलची बांबूपासून निर्मिती होऊ शकते. त्यामुळे बांबूची मागणी वाढणार आहे. त्यासाठी बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बँकेचे मार्गदर्शक अरविंद सा.पोरेड्डीवार यांच्याशी चर्चा केली. त्यामुळेच शेतकºयांना बांबूसाठी कर्ज देण्यासोबतच महाराष्ट्र वनविकास महामंडळामार्फत बांबूची रोपेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशा स्थितीत भविष्यात गडचिरोली जिल्ह्यात इथेनॉल निर्मिती प्रकल्प लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रंचित पोरेड्डीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Mobileमोबाइलbankबँक