शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महिला मजुरांवर काेसळली वीज; १ ठार, ११ जणी जखमी

By गेापाल लाजुरकर | Updated: September 20, 2024 19:06 IST

दाेघी गंभीर : आरमाेरी तालुक्याच्या डार्ली येथील घटना

गडचिराेली : धान पिकाच्या शेतातील कचरा (निंदण) काढणीचे काम सुरू असताना विजेचा कडकडाट सुरू झाला. यापासून बचाव करण्यासाठी महिला मजुरांनी रस्त्यालगतच्या नागाेबा मंदिराकडे धाव घेतली; पण क्षणातच हाेत्याचे नव्हते झाले. याचवेळी वीज काेसळून १ महिला जागीच ठार तर ११ जणी जखमी झाल्या. यापैकी दाेघी गंभीर आहेत. ही घटना आरमाेरी तालुक्याच्या डार्ली येथे शुक्रवार, २० सप्टेंबर राेजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.विजया विलास गेडाम (४०) रा. नराेटी माल, असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. आरमोरी तालुक्याच्या डार्ली येथील केशव लाकडे यांच्या धान शेतातील कचरा (निंदण) काढण्यासाठी तीन किमी अंतरावरील नरोटी माल येथील ११ महिला नेहमीप्रमाणे आल्या हाेत्या. सकाळपासून कचरा काढणीचे काम सुरू हाेते. दरम्यान, दुपारी २ वाजेच्या सुमारास वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. विजा व पावसापासून बचाव करण्यासाठी केशव लाकडे यांच्या शेतातील ११ महिला व दुसऱ्या शेतातील अन्य एका महिलेने रस्त्यालगतच्या नागोबा मंदिराच्या दिशेने धाव घेतली.

 

काही महिला मंदिरात आतमध्ये शिरल्या, तर काही महिला दरवाज्यावर बाहेरच उभ्या हाेत्या. तेवढ्यात वीज कडाडली व मंदिर परिसरातच पडली. मंदिराला लागूनच एक माेठे झाड आहे. यात मंदिराच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या विजया विलास गेडाम ह्या जागीच ठार झाल्या. तर सरिता श्रावण मडावी (५५) व संगीता प्रमोद गेडाम (२३) ह्या दाेन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती आरमाेरी पाेलिसांना मिळताच त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आरमाेरी येथे पाठविला.

९ महिलांवर पीएचसीमध्ये उपचारवीज पडून किरकाेळ जखमी झालेल्या ९ महिलांना वडधा प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली