शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आयुष्य ‘लाॅक’; पेट्राेल दरवाढ ‘अनलाॅक’! 30 वर्षांत लिटरमागे 90 रुपयांची वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 5:00 AM

१९९१ मध्ये गडचिराेलीत पेट्राेलचा दर केवळ १५ रुपये लिटर हाेता. २००१ मध्ये २९ रुपये प्रतिलिटर, २०११ मध्ये ७३ रुपये प्रतिलिटर हाेता, तर आता हा दर ९९ रुपयांवर पाेहाेचला असून, दाेन ते चार दिवसांत तो शंभरी गाठणार आहे. संचारबंदीमुळे पेट्राेलचा वापर जवळपास निम्म्यावर आला आहे. मागणी कमी झाल्याने दर वाढणे हा अर्थव्यवस्थेचा नियम आहे. मात्र, पेट्राेलच्या बाबतीत हा नियम लागू हाेत नाही काय?

ठळक मुद्देशंभरीच्या जवळ पाेहाेचले पेट्राेलचे दर, वाहन वापरणे झाले कठीण

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : संचारबंदीमुळे राज्यभरातील नागरिकांचे जीवन घरात लाॅक झाले आहे. त्यामुळे पेट्राेलचा वापर कमी झाला आहे. मात्र, पेट्राेलची दरवाढ कायम असून, गडचिराेलीत १३ मे राेजी पेट्राेलचा दर ९९.०४ रुपये हाेता. १९९१ ते २०२१ या कालावधीत पेट्राेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ८४ रुपयांची वाढ झाली आहे. बदललेल्या अर्थव्यवस्थेत मानवाचे जीवन गतिमान झाले आहे. त्याला आणखी गतिमान करण्यात वाहनांचा महत्त्वाचा वाटा आहे. वाहन हे अत्यावश्यक गरजेत माेडणारी वस्तू झाली असल्याने वाहनांची संख्या मागील काही वर्षांमध्ये वाढत चालली आहे. त्याचबराेबर पेट्राेल व डिझेलचे दरसुद्धा वाढत आहेत. १९९१ मध्ये गडचिराेलीत पेट्राेलचा दर केवळ १५ रुपये लिटर हाेता. २००१ मध्ये २९ रुपये प्रतिलिटर, २०११ मध्ये ७३ रुपये प्रतिलिटर हाेता, तर आता हा दर ९९ रुपयांवर पाेहाेचला असून, दाेन ते चार दिवसांत तो शंभरी गाठणार आहे. संचारबंदीमुळे पेट्राेलचा वापर जवळपास निम्म्यावर आला आहे. मागणी कमी झाल्याने दर वाढणे हा अर्थव्यवस्थेचा नियम आहे. मात्र, पेट्राेलच्या बाबतीत हा नियम लागू हाेत नाही काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. संचारबंदीच्या कालावधीतही पेट्राेल दरवाढ सुरूच आहे. मागील दहा दिवसांत पेट्राेलच्या दरात तब्बल पाच वेळा वाढ झाली आहे. 

पुन्हा सायकलवर फिरावे लागणार

दर दिवशी हाेणारी पेट्राेल व डिझेलच्या दरातील वाढ आवाक्याबाहेरची आहे. दिवसाची २०० रुपये मजुरी करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला आता दुचाकी परवडणारी नाही. त्यामुळे आता सायकलचा वापर करावा लागणार आहे. -गिरीष मेश्राम, बांधकाम मजूर

पेट्राेल व डिझेल हे शासनाने पैसे कमविण्याचे साधन बनविले आहे. निवडणुकीच्या कालावधीत पेट्राेल व डिझेलचे दर वाढविले जात नाहीत. निवडणुका संपताच भाववाढ हाेण्यास सुरुवात हाेते. शासनाची ही चाल असून, जनतेने सावध हाेण्याची गरज आहे.-पांडुरंग काेसरे, मजूर

वाढत्या महागाईनुसार काेणत्याही वस्तूच्या दरात वाढ हाेणे अपेक्षित आहे. मात्र, पेट्राेल व डिझेलच्या दरात माेठी वाढ हाेत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता वाहन वापरणे कठीण झाले आहे.        -गणेश बावणे, कर्मचारी 

पेट्राेलच्या दरावर कराचा भार अधिकपेट्राेल व डिझेलवर संपूर्ण अर्थव्यवस्थेची भिस्त आहे. या दाेन वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाल्यानंतर महागाई वाढण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे या दाेन वस्तूंवर कमी प्रमाणात कर आकारणी शासनाकडून अपेक्षित आहे. मात्र, शासन यातूनच अधिकाधिक कर गाेळा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यात पेट्राेलचा दर ९२ रुपये हाेता. त्यामध्ये पेट्राेलचा मूळ दर केवळ २९.७ रुपये एवढा हाेता. राज्य शासनाने २६.२ रुपये कर आकारला. केंद्राचा कर ३३ रुपये हाेता, तर ३.६९ रुपये हे  डीलरचे कमिशन हाेते. यावरून पेट्राेल दरवाढीत राज्य व केंद्र शासनाचा हात असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Petrolपेट्रोल