शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:46 IST

डोक्यावर भाल्याने वार करून बहिणीची हत्या करणाऱ्या आरोपीस भावास गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी दिला.

ठळक मुद्देडोक्यात खुपसला होता भाला : दुसरा भाऊ तीन वर्षांपासून फरारच, सिरोंचा तालुक्यातील नडिकुड्डातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डोक्यावर भाल्याने वार करून बहिणीची हत्या करणाऱ्या आरोपीस भावास गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी दिला.रमेश व्यंकटी जनगाम रा. नडीकुड्डा तालुका सिरोंचा असे आरोपीचे नाव आहे. तर बालका समय्या बोरमपल्ली असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतकाचा पती समय्या बोरमपल्ली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १ आॅगस्ट २०१५ रोजी सकाळी तो त्याची पत्नी मृतक समय्य बोरमपल्ली व गावातील मजूर, महाकाली कावेरी हिच्यासोबत शेतात काम करण्यासाठी गेले होते. समय्या हा डवरणीचे काम करीत होता. दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान रमेश व्यंकटी जनगाम व बापू व्यंकटी जनगाम शेतात आले. रमेश जनगाम याने बालकाच्या डोक्यात लोखंडी धारदार भाला मारला. बालका ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याने भाला मारला असल्याचे प्रत्यक्षदर्शी महाकाली कावेरी हिने बघितले. याप्रकरणी ३ आॅगस्ट रोजी रमेशला अटक करण्यात आली. बापू व्यंकटी जनगाम हा फरार आहे. दोन्ही बाजुचे साक्ष पुरावे तपासल्यानंतर रमेश जनगाम याला भादंवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक हजार रूपयाचा दंड सुनावला.सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास आसरअल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सचिन पवार यांनी केला. सहायक पोलीस निरिक्षक शरद मेश्राम यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय