अहेरीत शिबिर : परवान्यासाठी नागरिकांची गर्दीलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील वाहनधारकांची संख्या व क्षेत्रफळाचा विचार करून बाराही तालुकास्थळी परवाना शिबिर आयोजित केले जातात. अहेरी येथील जिल्हा परिषद विश्रामगृहात गुरूवारी घेण्यात आलेल्या शिबिरात १०० दुचाकी व २५ चारचाकी अशा एकूण १२५ वाहनधारकांना परवाने देण्यात आले. सदर एकदिवसीय वाहनपरवाना शिबिराला उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अशोक गंधमवार व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. वाहनपरवाना काढण्यासाठी अहेरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक युवक व नागरिक शिबिरस्थळी दाखल झाले होते. कागदपत्रांची तपासणी, ट्रायल प्रक्रिया यावेळी घेण्यात आली. परवाना काढणाऱ्यांकडून अर्जही भरून घेण्यात आला. आरटीओ विभागाच्या अशा शिबिरांचा जिल्ह्यातील वाहनधारकांना लाभ मिळत आहे. काही वर्षापूर्वी वाहनपरवानाबाबतचे शिबिर तालुकास्तरावर फारसे घेण्यात येत नव्हते. त्यामुळे सिरोंचा, अहेरी ते कोरची या टोकावरील नागरिकांना वाहनपरवाना काढण्यासाठी गडचिरोली जिल्हा मुख्यालय गाठावे लागत होते.
सव्वाशे वाहनधारकांना दिले परवाने
By admin | Updated: June 30, 2017 01:11 IST