शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कायमसाठी पाठपुरावा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:37 IST

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : सर्व शिक्षा अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम असून या अभियानात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कर्मचारी करार कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा ...

ठळक मुद्देखासदारांची ग्वाही : सर्वशिक्षा अभियानातील कर्मचाºयांचे अधिवेशन

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : सर्व शिक्षा अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम असून या अभियानात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कर्मचारी करार कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी दिली.सर्व शिक्षा अभियान करार कर्मचारी कृती समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूलमध्ये रविवारी एक दिवसीय अधिवेशन घेण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे पदाधिकारी रवींद्र ओल्लालवार, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, नगर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, कर्मचारी समितीचे सचिव भाऊराव हुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी संघटनेचे सल्लागार प्रफुल मेश्राम यांनी सर्व शिक्षा अभियानाचे कार्य व या कार्यात करार कर्मचाºयांचे योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी करार कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र शासनाने कर्मचाºयांच्या सेवेची दखल घेतली नाही, असे मेश्राम यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या सर्व शिक्षा अभियानातील करार कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत कायम करण्याबाबतचा ठराव पारीत करण्यात आला. यावेळी संघटनेच्या अन्य पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष वकील खेडेकर, संचालन ताराचंद भुरसे यांनी केले तर आभार भाऊराव हुकरे यांनी मानले.