काेराेना महामारीमुळे दिव्यांग व एकल विधवा महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यांना अनेक अडचणी येत असल्याने व्यवसायावर परिणाम हाेत आहे. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या माध्यमातून दिव्यांग व एकल महिलांना शेतीसाठी लागणारे धान बियाणे, सेंद्रिय खते व पौष्टिक अन्नघटक खाण्यासाठी परसबाग लावण्यासाठी बियाणांची मदत केली जात आहे. वैरागड येथील प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणून उपजीविका अधिकार क्षेत्र समन्वयिका छाया खरकाटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणात पर्यावरणीय शेती म्हणजे काय, पर्यावरणीय शेतीची गरज, पर्यावरणीय शेतीत करावे लागणारे प्रयोग, प्रक्रिया, बीज निवड, बीजप्रक्रिया, सेंद्रिय कीड नियंत्रणाची प्रक्रिया, दशपर्णी अर्क, जीवामृत, सेंद्रिय खते, धान लागवडीच्या पद्धती, बाजार व्यवस्था आणि पौष्टिक विषमुक्त परसबाग लागवड आदीविषयी माहिती देण्यात आली.
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी क्षेत्र समन्वयक महेश निकुरे आणि वैरागड येथील दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणाला वैरागड, पाटणवाडा, चामोर्शी माल येथील दिव्यांग व एकल महिला उपस्थित होत्या.
===Photopath===
270621\27gad_3_27062021_30.jpg
===Caption===
महिलांना मार्गदर्शन करताना समन्वयिका छाया खरकाटे.