तुळशी : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) अंतर्गत शेतीपुर व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी वडसामार्फत नुकताच शेतकऱ्यांना सावंगी येथील प्रगतशिल शेतकरी दादाजी अलोणे यांच्या शेतात देण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान कृषि विज्ञान केंद्र गडचिरोलीचे डाॕॅ. विक्रम कदम यांनी कुकुटपालन व शेळीपालन व्यवसाय शेती करत असतांना शेतीपुरक व्यवसाय कसे महत्वाचे आहे, याविषयी मार्गदर्शन केले. शेळीपालन व्यवसाय करतांना जागा, पाणी, गोठा व योग्य जातीच्या शेळीची निवड करुन व्यवसाय कसा यशस्वी करता येईल, याविषयी मार्गदर्शन करत कुकूटपालन व्यवसाय सुध्दा शेतीपुरक व्यवसाय असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांना आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीपुरक व्यवसाय निश्चितच साहय्यक ठरेल, असे मत वडसाचे तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम यांनी यावेळी व्यक्त केले. पुष्पक बोथिकर यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाविषयीमधुमक्षिका पालन व्यवसायाविषयी मार्गदर्शन केले. कृषि पर्यवेक्षक युगेश रणदिवे यांनी रोपवाटिका तयार करुन रोपवाटिकेतून शेतीला आर्थिक जोड कशी देता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषिपुरक व्यवसाय काळाची गरज असून शेतकऱ्यांनी कृषिपुरक व्यवसायाची कास धरावी, आत्माचे संचालकडाॅ. संदीप कऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना यासाठी अशाप्रकाचे प्रशिक्षण दिल्या जाईल, असे मार्गदर्शन तालुका तंत्र व्यवस्थापक महेंद्र दोनाडकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषिसेवक तुषार टिचकुले यांनी केले. संचालन कृषिसहाय्यक कल्पना ठाकरे यांनी तर आभार कृषि सहाय्यक कोटंगले यांनी मानले. प्रशिक्षणाला देसाईगंज तालुक्यातील नैनपूर, सावंगी, कोकडी,चोप ,आमगाव येथील शेतकरी उपस्थित होते.