शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष करायला शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:25 IST

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करण्याची मानसिकता व ताकद महिलांनी निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी केले.

ठळक मुद्देनगराध्यक्षांचे प्रतिपादन : गडचिरोली नगर परिषदेत महिला मेळावा

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करण्याची मानसिकता व ताकद महिलांनी निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी केले.नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी नगर परिषदेच्या प्रांगणात महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बालकल्याण सभापती पूजा बोबाटे, नगर परिषद सदस्य वर्षा नैताम, रितू कोलते, लता लाटकर, अल्का पोहणकर, मंजुषा आखाडे, वैष्णवी नैताम, गीता पोटावी, वर्षा बट्टे आदी उपस्थित होत्या.या कार्यक्रमादरम्यान सफाई कामगार महिलांना साडीचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांसाठी १०० मीटर दौड स्पर्धा, रस्सी खेच, मटका फोड, संगीत खुर्ची, चमचा-लिंबू स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या सदस्य व शहरातील इतर महिला उपस्थित होत्या.पुढे मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान सुद्धा दिले जाते. या अनुदानाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार स्थापन करावा, असे आवाहन केले.या कार्यक्रमादरम्यान स्वाती काथोड, प्रगती मामिडवार, सभापती अनिता विश्रोजवार, उपसभापती रंजना गेडाम यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. एकटी महिला उद्योग करू शकत नाही, मानसिकता लक्षात घेऊनच बचतगटांची स्थापना केली आहे. बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करण्याची चांगली संधी असल्याचे मार्गदर्शन उपस्थित महिलांना केले. कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका रितू कोलते यांनी केले.