शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

३२ कोटींच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:17 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी शब्द पाळला : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अहेरी उपविभागात १०० कोटींची कामे

ऑनलाईन लोकमत सिरोंचा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत. राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नागरिकांना दिलेला शब्द पाळत या कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे. ना. आत्राम यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ मंगळवारी झाला.मोेयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पार पडल्यानंतर बोरमपल्ली येथे सभा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, गतवर्षी शासनाकडून १८० कोटी रूपयांचा निधी आणण्यात आपल्याला यश मिळाले. पुढील वर्षी ३०० कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा-टेकडा-बोरमपल्ली या २० किमीच्या रस्त्यासाठी २० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. आसरअल्ली-कोपेला या १२ किमीच्या रस्ता कामासाठी १२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. सदर कामात खडीकरण, डांबरीकरण व इतर कामांचा समावेश असून रस्ता निर्मितीमुळे दुर्गम भागातील गावे बारमाही रस्त्याने जोडण्यात येणार आहेत. परिणामी वाहनांची वाहतूक वाढणार आहे.सभेला प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचाचे नगरसेवक संदीप राचेर्लावार, नाविसंचे उपाध्यक्ष संतोष पडालवार, नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, श्रीनाथ राऊत, दिलीप सनीगारापू, रवी चकीनारापू, संतोष पटला, पाणीपुरवठा सभापती विजय तोकला, पं. स. सदस्य जयमना दुर्गम, स्वामी मासर्ला, बाबर शेख, रामन्ना कडार्ला, सुरेश पद्मगिरीवार, जयेंद्र श्रीपती, नीलेश गग्गुरी, अशोक पेद्दी, राजेशम कासेट्टी, मलान्ना संगर्ती, राजबापू पोलमपल्ली आादी उपस्थित होते.तथाकथित राजकारणाला बळी पडू नका-आत्रामकाही लोक गैरसमज पसरवित असतात. अशा लोकांवर विश्वास ठेवून नागरिकांनी तथाकथित राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही जी कामे झाली नाहीत, ती कामे आपण सिरोंचा तालुक्यात पूर्ण करणार, असे ते म्हणाले.