शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चषक स्पर्धेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:37 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सीएम चषक स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनीत खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्दे१४ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी : शहारातून निघाली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सीएम चषक स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनीत खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. सीएम चषक स्पर्धा ही भारतातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून, विधानसभा क्षेत्रातून विजयी संघ व खेळाडूंना जिल्हा व त्यानंतर राज्य स्तरावर खेळण्याची संधी मिळणार असल्याने गडचिरोली जिल्ह्याचे नाव लौकिक करता येणार आहे. या संधीचे सोने करीत आपण राज्यस्तरीय स्पर्धा जिंकण्यासाठी खेळावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी केले. सर्वप्रथम गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली. भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, डॉ. भारत खटी, भाजप शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, चामोर्शी नगर पंचायतीच्या अध्यक्ष प्रज्ञा उराडे, धानोरा नगर पंचायत अध्यक्ष लीना साळवे, गडचिरोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, महामंत्री चेतन गोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, गडचिरोली भाजपा तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, धानोरा भाजपा तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, चामोर्शी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, सीएम चषक जिल्हा संयोजक अनिल तिडके, विधानसभा संयोजक गणेश नेते, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष डी. के. मेश्राम, महामंत्री जनार्धन साखरे, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, दत्तू माकोडे, सीएम वॉर रूमचे निकेश कुकडे, आयोजन समितीचे संयोजक अविनाश महाजन, प्रशांत येगोलपवार, निखिल चरडे, नरेश अलसावार, सारंग साळवे, जिल्हा परिषदेचे सदस्य, गडचिरोली चामोर्शी व धानोराचे न. पं. सभापती, नगरसेवक पं. स. सदस्य, नगर सेवक, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळीAshok Neteअशोक नेते