शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

क्लस्टर योजनेला अखेरची घरघर

By admin | Updated: September 27, 2014 01:36 IST

जिल्ह्यातील काही गावांची निवड करून तेथील गावकऱ्यांना शासनाच्या सर्वच योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या उद्देशाने मागील वर्षी

दिगांबर जवादे गडचिरोलीजिल्ह्यातील काही गावांची निवड करून तेथील गावकऱ्यांना शासनाच्या सर्वच योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या उद्देशाने मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या मार्गदर्शनात महसूल व कृषी विभागाने मिळून क्लस्टर योजना सुरू केली होती. मात्र कृष्णा यांची बदली झाल्यानंतर या योजनेकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदर योजना केवळ फार्स ठरल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो योजना आहेत. या योजनांसाठी आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिल्या जाते. यातील बहुतांश निधी खर्च झाल्याचेही दाखविण्यात येते. मात्र नागरिकांचा विकास आहे त्याच ठिकाणी कायम आहे. याचा सखोल अभ्यास तत्कालीन जिल्हाधिकारी कृष्णा यांनी केला. अभ्यासाअंती असे दिसून आले की, काही शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेत शेतात विहीर खोदली आहे. मात्र त्याच्याकडे विद्युत मोटारपंप किंवा डिझेल इंजिन नाही. त्यामुळे शेत करपत असतांनाही तो विहिरीतील पाणी शेताला देऊ शकत नाही. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांकडे विहीर व मोटारपंप आहे. मात्र त्याला विद्युत जोडणी नसल्याने विहीर व मोटारपंपही पडूनच आहेत. ही गंभीर बाब लक्षात आली. यावर उपाय व प्रयोग म्हणून २०१३ च्या खरीप हंगामात क्लस्टर योजना सुरू केली. या योजनेंतर्गत १५ क्लस्टरची निवड करण्यात आली. एका क्लस्टरमध्ये ७ ते ८ गावांचा समावेश होता. असे एकूण जवळपास ८० गावांची निवड करून या गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत महसूल, विद्युत, आरोग्य, कृषी, शिक्षण विभागाच्या सर्वच योजना प्राधान्याने या ठिकाणी राबविण्यात आल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर होती. त्यांना कृषी विभागाने तत्काळ मोटारपंप दिले, विद्युत विभागाने विद्युत जोडणी दिली, आवश्यक असलेली सर्व यंत्र सामुग्री पुरविण्यात आली. गावातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड, श्री पद्धतीने धानपिकाची लागवड आदींचे प्रात्यक्षिक देण्यात आले. महसूल विभागाने या गावांमध्ये मेळावे घेऊन जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व इतरही आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्याच्या उद्देशाने शिक्षकांचेही पदे रिक्त राहणार नाही. यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. सर्वच योजनांचा लाभार्थीनुसार लाभ देण्यात आल्याने गावामध्ये विकासाची गंगा आल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. शेतकरीवर्ग उत्साहाने काम करीत होता. मात्र या योजनेचे प्रमुख मार्गदर्शक असलेल्या जिल्हाधिकारी कृष्णा यांची बदली झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहीले नाही. त्यांच्या जाण्यानंतर सदर योजनेकडे अधिकाऱ्यांनी कायमची पाठ फिरविली. सदर योजना मागील वर्षी प्रायोगिक तत्तावर राबविण्यात आली होती. त्यानंतर सदर योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार होती. मात्र सध्या या योजनेला लागलेली आहोटी लक्षात घेता तो केवळ एक फार्स होता. अशी टिका स्थानिक नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून होत आहे. सदर योजना जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी पुन्हा कार्यान्वीत करावी, अशी मागणी होत आहे.