गडचिरोली : गडचिरोली व आरमोरी शहराच्या मुख्य मार्गावर दिवसा व रात्रीच्या सुमारास मोकाट जनावरांचा हैदोस राहत असून जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी असतात तर काही ठिकाणी जनावरांचा ठिय्या असतो. या प्रकारामुळे बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताची शक्यता बळावली आहे.आरमोरी येथील बर्डी भागातील वडसा व ब्रह्मपुरी मार्गावर नेहमीच मोकाट जनावरे बसून असतात. सदर दोन्ही मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. जनावरांना वाहनांची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यास जनावर मालक वाहनमालकांना जबाबदार धरतात. परिणामी त्यांच्यावर आर्थिक भूर्दंड बसतो. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौक परिसर व चारही प्रमुख मार्गांवर सायंकाळी जनावरांचा ठिय्या दिसून येतो. बंदोबस्ताकडे दुर्लक्ष आहे.
मोकाट जनावरांचा हैदास वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST
आरमोरी येथील बर्डी भागातील वडसा व ब्रह्मपुरी मार्गावर नेहमीच मोकाट जनावरे बसून असतात. सदर दोन्ही मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. जनावरांना वाहनांची धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झाल्यास जनावर मालक वाहनमालकांना जबाबदार धरतात.
मोकाट जनावरांचा हैदास वाढला
ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : गडचिरोली, आरमोरी शहरात अपघाताची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्क