शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

८३ गावांतील जमिनीची चाचणी

By admin | Updated: December 11, 2015 01:52 IST

राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील

शेतकऱ्यांना मार्गदर्शक : मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाचा उपक्रमगडचिरोली : राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील ८३ गावांमधील जवळपास १५ हजार हेक्टर जमिनीमधील नमुने घेऊन त्यांची चाचणी केली आहे. चाचणी झालेल्या जमिनीच्या मालकांना आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. जमिनीचा प्रकार व पीक यांचा थेट संबंध आहे. पिकाला योग्य असलेल्या जमिनीत लागवड झाल्यास त्या ठिकाणी कमी खर्चात शेतीतून चांगले उत्पादन मिळत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतातील जमिनीमध्ये कोणते घटकद्रव्य आहेत. हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे आरोग्य कळावे यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय शास्वत शेती हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत देशभरातील संपूर्ण जमिनीची तपासणी केली करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०१५-१६ या आर्थिक वर्षात १३ हजार ६५९ नमुने घेण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत ८३ गावांमधील १ हजार ७७१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. चाचणी झालेल्या नोंदणीकृत ३ हजार १३१ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण केले जाणार आहे. काही शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याच्या शेतांतर्गत येणाऱ्या भागामध्ये मृद चाचणी झाली असल्यास संबंधित शेतकऱ्याने मागणी केल्यास त्यालाही आरोग्य पत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हा मृद चाचणी सर्वेक्षण विभागाकडे २ हजार ५९७ नमुने दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ७७१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यातील १२०, धानोरा २१६, देसाईगंज १ हजार ६१, आरमोरी २३८, कोरची ९६, कुरखेडा तालुक्यातील ४० नमुने तपासण्यात आले आहेत. मृद चाचणीमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य कळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ते जमिनीच्या पोतानुसार पिकाची लागवड करू शकणार आहेत. (नगर प्रतिनिधी)चाचणी झालेल्या गावांची नावेमृद चाचणी झालेल्या गावांमध्ये कोटगल, मुडझा, पारडी, नवेगाव, धानोरा तालुक्यातील मिचगाव, केसनिल, बोरी, येरसगोंदी, पदाबोरीया, हिपानेर, बोदीन, पाथरगोटा, रोठारिल, गुरानटोला, रूपीनगट्टा, तुळमेघ, कोंडेवाडा, हंटाझूर, निमगाव, मासरी घाटा, निमनवाडा, रांगी, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, विहिरगाव, पोटगाव, विठ्ठलगाव, पिंपळगाव, किन्हाळा, डोंगरगाव, अरततोंडी, फरी, चिखली, उसेगाव, विसोरा, एकलपूर, आमगाव, बोडधा, बोडधा तुकूम, सावंगी, गांधीनगर, कुरूड, शंकरपूर कसारी, कळमगाव, शेलदा, डोंगरमेंढा, कोरेगाव व चोप, आरमोरी तालुक्यातील नागरवाही, मानापूर, कोसरी, देलनवाडी, मांगदा, नवरगाव मक्ता, मंजेवाडा, खैरी रिठ, देवीपूर, बोडधा चक, चिचोली, हिरापूर रिठ, मोहझरी, मुल्लूर चक, रवी, सुकाळा, मेंढेबोडी, कोरची तालुक्यातील बोटेझरी, नारकसा, न्याहालड, टेकामेटा, पुलरगोंदी, कहाकाबोडी, भिमनकोजी, रानगट्टा, तलवारगड, कुरखेडा तालुक्यातील ठुसी, येडसकुही रिठ, कमलपाल, चरवीदंड, गांगसाय टोला, जांभळी या गावांचा समावेश आहे.मृदा चाचणीची गती संथदर तीन वर्षाने जमिनीतील नत्र, स्पुरद, पालाश, सामू यांच्या प्रमाणात बदल होत असल्याने दर तीन वर्षांनी मृदा तपासणी होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शेत जमिनीचे ४० हजार ९७७ नमुने निघतात. त्यानुसार दरवर्षी जवळपास १३ हजार नमुन्यांची तपासणी होणे गरजेचे असल्याने तेवढेच लक्षांक ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबर महिना सुरू झाला तरी केवळ २ हजार ५९७ नमुने प्राप्त झाले आहेत. त्यातही केवळ १ हजार ७७१ नमुन्यांची चाचणी पूर्ण झाली आहे. पुढील पाच महिने शिल्लक असले तरी नमुने तपासणीची गती लक्षात घेतली तर मार्च अखेरपर्यंतही लक्षांकापर्यंत कठीण होणार आहे.नाममात्र दरात होते नमुना चाचणीशाश्वत शेती अंतर्गत कृषी सहायक स्वत:च मातीचे नमुने घेऊन येतात. या नमुन्यांची तपासणी पूर्णपणे मोफत केली जाते. मात्र एखाद्या शेतकऱ्याने स्वत:च्या जमिनीची वैयक्तिक चाचणी करतो म्हटल्यास त्यालाही अत्यंत नाममात्र शुल्क आकारले जाते. सर्वसाधारण नमुन्यासाठी ३५ रूपये व सुक्ष्म नमुन्यासाठी २३५ रूपये शुल्क आकारल्या जाते.