शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डा प्रकल्पासाठी जबरीने जमिनीचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:39 IST

कौसर खान । लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : तेलंगणा सरकारतर्फे गोदावरी नदीवर बांधल्या जाणाऱ्या मेडिगड्डा धरणासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मारहाण : जमीन देण्यासाठी टाकला जात आहे दबाव

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा सरकारतर्फे गोदावरी नदीवर बांधल्या जाणाऱ्या मेडिगड्डा धरणासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र त्यांची जमीन बळजबरीने अधिग्रहीत करण्याचा प्रयत्न तेलंगणा सरकारकडून केला जात आहे. संबंधित शेतकऱ्यांना तुरूंगात डांबण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा तेलंगणा राज्याला होणार असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री सी.चंद्रशेखर राव हे स्वत: लक्ष घालून प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेलंगणा सरकार मोठ्या प्रमाणात या प्रकल्पावर खर्च करीत आहे. सिरोंचा तालुक्यातील १० ते १५ गावांची जमीन या प्रकल्पामध्ये जाणार असल्याने नागरिकांमध्ये या प्रकल्पाविषयी तीव्र नाराजी आहे.यापूर्वीही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून मेडिगड्डा प्रकल्प होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही विरोध दर्शविला, मात्र तेलंगणा सरकारने महाराष्ट्र शासनावर दबाव आणला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न जुमानताच प्रकल्पाचे काम रेटले जात आहे. लंबटपल्ली ते नडीगुडा गावापर्यंतच्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पात जाणार आहे. पोचमपल्लीतील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असता, त्यांना तेलंगणातील पोलीस स्टेशनमध्ये बोलवून मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या शेतकºयांनी जमीन देण्यास नकार दिला, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्र शासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती