शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

जिल्ह्यात काेराेना संकटकाळात लाेकप्रतिनिधींनी सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

जि.प.चे  मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गडचिराेली शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, शहरी प्राथमिक आराेग्य केंद्र गाेकुलनगर व पाेलीस रुग्णालय या चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत; पण लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी काेराेना लसीकरणाचा लाभ घ्यावा.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : न. प. पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : देशात काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस राज्यातही काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गडचिराेली शहरात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची अंमलबजावणी करीत आहे. या लढ्यात पालिकेसह जिल्ह्यातील सर्व लाेकप्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करून याेगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. स्थानिक नगर परिषदेचे सर्व सभापती व नगरसेवकांची विशेष सभा ४ एप्रिल राेजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवनात सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बाेलत हाेते. गडचिराेली शहरातील बहुतांश वाॅर्डांत काेराेनाचे रुग्ण आढळत आहेत. ज्या ठिकाणी १० ते १२ रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र घाेषित करण्यात येत आहे. शिवाय सभाेवतालचा परिसर बफर झाेन असणार आहे. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या वाॅर्डातील प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन लाेकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करणे, घरच्या कुटुंबातील सदस्य व शेजाऱ्यांची काेराेना तपासणी करून घेणे, तसेच ४५ वर्षांवरील लाेकांना काेराेनाची लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे याबाबतची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकाने पाळावी, असे जिल्हाधिकारी सिंगला यावेळी म्हणाले. जि.प.चे  मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गडचिराेली शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, शहरी प्राथमिक आराेग्य केंद्र गाेकुलनगर व पाेलीस रुग्णालय या चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत; पण लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी काेराेना लसीकरणाचा लाभ घ्यावा. लाेकांच्या मनातील शंका व भीती दूर करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे, या कार्यात सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले याेगदान द्यावे, असे आवाहन आशीर्वाद यांनी केले. यावेळी काेविड उपाययाेजनांवर चर्चा झाली.बैठकीला नगराध्यक्ष याेगिता पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओहाेळ, उपाध्यक्ष तथा आराेग्य सभापती अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, नियाेजन सभापती प्रशांत खाेब्रागडे यांच्यासह नगरसेवक तसेच पालिकेच्या आराेग्य विभागाचे प्रमुख  उपस्थित हाेते. 

खबरदारी घ्या-डाॅ. रुडेजिल्ह्यात अचानक काेराेना रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णालयात बेड, रक्त पुरवठा व ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकताे. त्यामुळे प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. सतत ताेंडावर मास्क वापरणे, नियमित हात सॅनिटाइज करणे व सामाजिक अंतर पाळून आपण काेराेनाशी लढा देऊ शकताे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल रुडे यांनी बैठकीत सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या