शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तणसात लपवली सव्वातीन लाखाची दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:02 IST

धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पण आरमोरी तालुक्यात येणाऱ्या वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेत्याच्या शेतातील अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ३ लाख २४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे ही दारू शेतातील धानाच्या तणसाच्या ढिगात लपवून ठेवली होती.

ठळक मुद्देआरोपी फरार : वडेगावच्या शेतावर धाड टाकून जप्त केला २७ पेट्यांचा साठा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पण आरमोरी तालुक्यात येणाऱ्या वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेत्याच्या शेतातील अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ३ लाख २४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे ही दारू शेतातील धानाच्या तणसाच्या ढिगात लपवून ठेवली होती. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, धानोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांना वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेता मधुकर बाबुराव कापसे या दारू तस्कराच्या दारूसाठ्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वात धानोरा ठाण्याच्या पथकाने सायंकाळी सापळा रचून शेतशिवाराच्या तणसाच्या ढिगाºयात लपवून ठेवलेल्या इम्पेरियल ब्लू (आयबी) कंपनीच्या २७ पेट्या दारू जप्त केली. या दारूची किंमत अंदाजे ३ लाख २४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही सर्व दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक हिंमतराव सरगर, पोकॉ. नितीन पिलारे, चेतन फुले, प्रकाश कृपाकर, दिनदयाल गुरभेले, रतन पुरे आदींनी केली.धानोरा व आरमोरी तालुक्यात तस्कराचा धुमाकूळआरोपी मधुकर कापसे याच्यावर यापूर्वीही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. चारचाकी वाहनाने दारू आणून शेतात लपवून ठेवणे आणि दुचाकी वाहनाने इतरत्र पुरवठा करणे अशी त्याची पद्धत आहे. धानोरा, आरमोरीसह वरदा, वैरागड, मरेगाव, पिसेवरदा आदी भागात नियमित दारू पुरवठा केल्या जात असल्याचे समजते. परंतू स्थानिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. या कारवाईनंतर आरोपी कापसे फरार झाला. त्याच्यासह त्याच्या सहकाºयांचा लवकरच शोध घेऊ असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदी