शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

बांधकामाच्या मजुरीपासून मजूर वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

धानाेरा : तालुक्यातील बाेदीन येथे विविध याेजनांच्या माध्यमातून बांधकामे करण्यात आली. परंतु अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप मजुरी मिळाली ...

धानाेरा : तालुक्यातील बाेदीन येथे विविध याेजनांच्या माध्यमातून बांधकामे करण्यात आली. परंतु अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप मजुरी मिळाली नाही. त्यामुळे मजुरांमध्ये संताप आहे. लवकर मजुरी न दिल्यास मुंगनेर ग्राम पंचायतीला कुलूप ठाेकण्यात येईल, असा इशारा बाेदीनवासीयांनी पंचायत समितीमार्फत जि. प. सीईओंना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला. धानाेरा तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर छत्तीसगड सीमेलगत मुंगनेर हे गाव आहे. मुंगनेर ग्रा. पं. अंतर्गत बाेदीन हे गाव येते. बाेदीन येथे आदिवासी सुधार याेजना, ठक्करबाप्पा याेजनेंतर्गत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही मजुरी देण्यात आली नाही. ग्रामसेवक व बीडीओंना याबाबत विचारणा केली असता, केवळ आश्वासन देण्यात आले. तसेच गावातील शाैचालय बांधकामाचे अनुदान दाेन वर्षापासून मिळाले नाही. येनगाव येथील शाळा वर्गखाेली बांधकामाची मजुरी मिळाली नाही. मुंगनेर येथील आराेग्य उपकेंद्राच्या संरक्षक भिंत बांधकामाची मजुरी व साहित्याचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे लवकर मजुरी द्यावी, अन्यथा मुंगनेर ग्रा. पं. ला कुलूप ठाेकण्यात येईल, असा इशारा बाेदीन ग्रामसभेने दिला आहे. यावेळी ग्रामसभाध्यक्ष महादेव जाळे, सचिव अंताराम उसेंडी, ऋषी जाळे, दयाराम गावळे, शेरू कुमाेटी, सुरेश जाळे, जग्गू जाळे, शालिकराम धुर्वे, सुरजू पदा, रूमदेव जाळे, देवसाय धुर्वे, साेनू किरकाे, जयराम गावडे, देवकू धुर्वे, वासुदेव जाळे, रमेश धुर्वे, साधुराम जाळे, सनकू मडावी, उत्तम जाळे, याेगी जाळे, सनकू गावडे उपस्थित हाेते.

बाॅक्स ......

खुर्चीला दिले निवेदन

धानाेरा तालुक्याच्या दुर्गम व नक्षलग्रस्त बाेदीन गावातून अनेक नागरिक धानाेरा येथे पंचायत समितीमध्ये निवेदन देण्यासाठी आले हाेते. परंतु संवर्ग विकास अधिकारी कार्यालयात हजर नव्हते. तेव्हा नागरिकांनी रिकाम्या खूर्चीला निवेदन दिले. दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याने त्यांनी राेष व्यक्त केला.