शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाने एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:20 IST

कुणबी समाज पोटजातींमध्ये विखुरला आहे. त्यामुळे या समाजातील अनेक समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. विखुरलेल्या या समाजाने एकजूट झाल्यास समस्या सुटू शकतील. त्यामुळे कुणबी समाजाने एकजूट व्हावे, असे प्रतिपादन प्रसिध्द वक्ते प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देदिलीप चौधरी यांचे प्रतिपादन : किष्टापूर येथे समाज प्रबोधन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : कुणबी समाज पोटजातींमध्ये विखुरला आहे. त्यामुळे या समाजातील अनेक समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. विखुरलेल्या या समाजाने एकजूट झाल्यास समस्या सुटू शकतील. त्यामुळे कुणबी समाजाने एकजूट व्हावे, असे प्रतिपादन प्रसिध्द वक्ते प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर येथे तालुका कुणबी समाज संघटना चामोर्शी तसेच कुणबी समाज संघटना किष्टापूर यांच्या वतीने २८ जानेवारी रोजी भव्य समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.गटागटात विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्रित आणण्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजातील युवक, युवती, समाजबांधवांमध्ये शिक्षण, नोकरीतील आरक्षण, शिष्यवृत्ती, मंडल आयोग, शिक्षण पध्दती, शेतकºयांचे प्रश्न, शेतमालाला भाव, बेरोजगारी आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.किष्टापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आयोजित समाज प्रबोधन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी महाविद्यालय येणापूरचे माजी प्राचार्य जयंत येलमुले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिध्द वक्ते प्रा. दिलीप चौधरी, व्याख्याता राजश्री नितेश गोहणे, प्रमुख अतिथी म्हणून तालुका कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष बाळू दहेलकर, पंचायत समिती सदस्या वंदना गौरकार, कुणबी समाज संघटना किष्टापूरचे अध्यक्ष सिताराम पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ते नीलकंठ निखाडे, सोमनपल्ली ग्रा.पं.चे सरपंच आनंद पिदुरकर, बाबुराव बकाले उपस्थित होते.समाज प्रबोधन मेळाव्याला चामोर्शी तालुक्यातील कुणबी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी सहकार्य केले.ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व मार्गदर्शनसमाज प्रबोधन मेळाव्यात कुणबी समाजातील विविध प्रश्न, तसेच मागील दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती, नॉन क्रिमीलेअर रद्द करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहाची निर्मिती करणे तसेच विद्यार्थ्यांच्या अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील ओबीसी शेतकºयांना योजनांचा लाभ देणे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करणे, शेतकरी हिताच्या विविध योजना राबवून त्याचा लाभ देणे यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.