शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुका झाला कसायांचा अड्डा

By admin | Updated: November 4, 2014 22:40 IST

तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनावरे कसायाच्या दावणीला बांधली जात असल्याने कोरची तालुक्यातील पशुधन झपाट्याने घटत आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.

कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनावरे कसायाच्या दावणीला बांधली जात असल्याने कोरची तालुक्यातील पशुधन झपाट्याने घटत आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. दिवसेंदिवस चराईचे क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग जनावरे पाळण्यास तयार नाही. शेतकऱ्यापेक्षा कसायी अधिक किंमत देत असल्याने शेतकरीसुद्धा आपली जनावरे कसायालाच विकत आहेत. छत्तीसगड व हैदराबाद येथील व्यापाऱ्यांनी कोरची तालुक्यातील बोरी, घुघगा, भीमपूर, कोटगूल, गणेशपूर, बेतकाठी, बोटेकसा, कोटरा, बेलगावघाट, कोसमी, कुरखेडा तालुक्यातील पुराडा, रामगड, गेवर्धा, देसाईगंज तालुक्यातील आमगाव, शंकरपूर, आरमोरी तालुक्यातील मुरमाडी, मुरूमगाव, सावरगाव या गावांमध्ये दलाल नेमले आहेत. सदर दलाल जनावरे खरेदी केल्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास गावातून जनावरे नेतात. गावाच्या जवळच ठेवण्यात आलेल्या ट्रकमध्ये कोंडून नागपूर येथील कत्तलखान्यात सदर जनावरे पाठविली जातात. क्षमतेपेक्षा अधिक जनावरे ट्रकमध्ये कोंबून भरली जातात. त्यामुळे जनावरांना श्वास घेणेही अडचणीचे होते. काही जनावरांचा वाहतुकीदरम्यानच मृत्यू होतो. कोरची तालुका जंगलव्याप्त आहे. त्यामुळे जनावरांना चराईसाठी मुबलक जागा होती. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पशुधन पाळत होते. मात्र दिवसेंदिवस जंगलाखालील क्षेत्र कमी होत चालले आहे. त्याचबरोबर वनविभागाने जंगलात जनावरांना चरण्यास बंदी घातली असल्याने जनावरे चारावी कुठे असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश पशुपालक गोधन कसायाला विकत आहेत. परिणामी आजपर्यंत जनावरांनी भरून दिसणारे गोठे रिकामे व्हायला लागले आहेत.