शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli | कोनसरी लोह प्रकल्प 'गेम चेंजर' ठरेल; एप्रिलपर्यंत सुरू होणार पाहिला टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 14:46 IST

१८ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित

गडचिराेली : एटापल्ली तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील कच्चे लोखंड कोनसरी भागात प्रक्रिया प्रकल्प उभारुन पोलाद निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाकरता १८ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून याचा पहिला टप्पा एप्रिलपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार नव्याने सत्तारुढ झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले असून यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.

सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील कच्चे लोखंड कोनसरी भागात प्रक्रिया प्रकल्प उभारून पोलाद निर्मिती केली जाणार आहे. या लोह खनिज प्रक्रिया प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार व विकासाला चालना मिळेल. जिल्ह्यासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. यासह मेडीगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या शेतजमिनीचे अधिग्रहण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

गडचिरोलीत घेतलेल्या पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGadchiroliगडचिरोली